आत्तापर्यंत तुम्ही फारच कमी वेळा वृध्द दाम्पंत्यांची लग्न झालेली पाहिली असतील. पण काही आगळ्यावेगळ्या प्रेमाची गोष्ट तुम्हाला माहीत आहेत का? भारतातल्या एका वृद्ध दांपत्याने वयाची साठी पार केल्यानंतर लग्न केलं आहे. या वयात सुद्धा अत्यंत वाजत गाजत या जोडप्यांनी लग्न केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ही मंडळी.
केरळमधील त्रिशूरच्या रामवरमपुरम या ठिकाणी एक सरकारी वृध्दाश्रम आहे. या वृध्दाश्रमात राहत असलेले ६७ वर्षांचे कोचनियान मेनन आणि ६६ वर्षांच्या लक्ष्मी अम्मल यांनी शनिवारी लग्न केलं आहे. हे दोघ वृध्द एकमेकांना ३० वर्षींपासून ओळखत होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं एकमेकांच्या संपर्कात नव्हते.
अम्मल यांचे पती कॅटरिंगच काम करत होते. त्याचं २१ वर्षांपूर्वी निधन झालं. कोचनियान मेनन आणि लक्ष्मी अम्मल हो दोन वृध्द एकमेकांना वृध्दाश्रमात भेटले. नंतर त्या दोघांना या वयातसुद्धा एकमेकांवर प्रेम झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत थाटमाटात यांनी लग्न केलं आहे.