काही लोक प्राण्यांवर इतकं प्रेम करतात की, ते त्यांच्या मदतीसाठी नेहमी तयार राहतात. ताजं प्रकरण गोल्ड फिश संबंधित आहे. या माशाला स्विम ब्लॅडर डिसऑर्डरमुळे पोहण्यात अडचण येत होती. अशात मालकाने माशासाठी एक 'वॉटर व्हिलचेअर' तयार केली.
रिपोर्टनुसार, साउथ कोरियाचे हेनरी किम व्यवसायाने एक फॅशन डिझायनर आहेत. त्यांच्याकडे तीन फिश टॅंक आहे. ज्यातील एक मासा स्वीमिंग करू शकत नव्हता. मग त्यांनी आयडिया कल्पना लावून एक भन्नाट वॉटर व्हिलचेअर तयार केली. त्यांनी तयार केलेल्या व्हिलचेअरचं सध्या चांगलंच कौतुक होत आहे.
३२ वर्षीय हेन्रीकडे ३ फिट टॅंक आहेत. ज्यात २० पेक्षा अधिक गोल्ड फिश आहेत. याआधी त्यांचे अनेक मासे स्विम ब्लॅडर डिसऑर्डर झाल्या कारणाने मृत झाल्या होत्या. अशात त्यांनी यावेळी त्यांच्या गोल्ड फिशला वाचण्याचा निर्णय घेतला.
ही व्हिलचेअर तयार करण्यासाठी हेनरीने गुगलची मदत घेतली. सर्वातआधी त्यांनी यूट्यूबवर यासंबंधित व्हिडीओ आणि ट्यूटोरिअल्स पाहिले. नंतर त्यांनी प्लास्टिकच्या मदतीने गोल्ड फिशसाठी एक छोटिशी व्हिलचेअर तयार केली. आता हा मासा या व्हिलचेअरच्या मदतीने आरामात टॅंकमध्ये इकडे-तिकडे फिरू शकतो.
काय असतो स्विम ब्लॅडर डिसऑर्डर?
(Image Credit : DailyMail)
हेनरी सांगतात की, 'स्विम ब्लॅडर डिसऑर्डर' मुळे माशांना पोहोण्यासाठी अडचण येते. ही एक सामान्य समस्या आहे. ज्यामुळे मासा काही महिन्यात मरण पावतो. ही समस्या त्यांना जास्त खाल्ल्याने किंवा घाणेरडं पाणी प्यायल्याने होते. मात्र, आता या डिवाइसच्या मदतीने मासा जवळपास ५ महिन्यांपर्यंत जगू शकणार आहे.