म्हातारपणात अनेकांना आई वडिलांचे ओझं वाटू लागतं. घरातही अडगळीप्रमाणे किंवा वृद्धाश्रमात म्हाताऱ्या आई वडिलांची जागा असते. पण काही मुलं अशी ही असतात जी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करतात. त्यांना काय हवं नको ते बघतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलियुगातील श्रावण बाळाबद्दल सांगणार आहोत. कर्नाटकातील मैसुरमध्ये वास्तव्यास असलेल्या कृष्णकुमार नावाच्या माणसानं आपलं संपूर्ण जीवन आई वडिलांची सेवा करण्यात घालवण्याचं ठरवलं आहे.
४२ वर्षीय कृष्णा हे आपल्या ७० वर्षीय आईला तीर्थयात्रेला घेऊन निघाले आहेत. जवळपास तीन वर्षांपूर्वी कृष्णा यांनी हा प्रवास सुरू केला आणि या वर्षी हा प्रवास संपला. तुमचा विश्वास बसणार नाही पण आईला तीर्थक्षेत्र फिरवण्यासाठी कृष्णकुमार यांनी तब्बल ५६ हजार ५२२ किलोमीटरचा प्रवास केला आहे.
कृष्णाकुमार यांनी बँगलूरू मिररशी बोलताना सांगितले की, ''ही स्कुटर माझ्या वडिलाची आहे. २००१ साली यांनी मला ही स्कुटर त्यांनी भेट म्हणून दिली होती. २०१५ ला माझे वडील आम्हाला सोडून देवाघरी गेले. त्यानंतर फक्त आई माझ्यासोबत असल्यानं मी याच स्कुटरवरून आईला तीर्थयात्रेला नेण्याचं ठरवलं. जेणेकरून तीर्थयात्रेला माझे वडिलही माझ्यासोबत आहेत असं आम्हाला नेहमी वाटेल.''
कृष्णा यांच्या आईने सांगितले की, ''तीर्थस्थळांना भेट देण्याच्या प्रवासादरम्यान आम्ही कधीही कोणत्या हॉटेलमध्ये थांबलो नाही. नेहमी मंदिरं, मठ, धर्मशाळांमध्ये आम्ही आश्रयासाठी थांबलो. मला कधीही प्रवासात आरोग्याशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागला नाही. माझ्या मुलानं अगदी व्यवस्थित काळजी घेतली. या प्रवासादरम्यान मला इतका आनंद झाला की, मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. ''
कृष्णा बँगलुरूच्या प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते. आईला तीर्थक्षेत्रांची सफर करून आणण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. २ वर्षात काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंतची तीर्थस्थळ यांनी पाहिली. १६ जानेवारी २०१८ ला या प्रवासाला सुरूवात केली होती. या प्रवासाला त्यांना 'मातृसेवा संकल्प' असं नाव दिलं आहे. सोशल मीडियावरही या माय लेकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे पण वाचा-
सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'
शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...