कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना संसर्गापासून लांब ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाउननंतर टप्प्या टप्प्यात अनलॉकची करण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या सुचनांनुसार वेगवेगळ्या सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनासंदर्भातील शासनाने दिलेले नियम पाळून सामाजिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन केलं जात आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. सण उत्सवांच्यावेळी जास्त गर्दी करू नका असं सांगितलं जात असतानाही लोक काही ऐकायला तयार नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका साडीच्या दुकानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. "मला बोलू द्या ना", मराठमोळ्या बापलेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही म्हणाल वाह, क्या बात है...
शिव अरोर आणि अरूण बोथरा यांनी ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.'' चेन्नईमधील साडीचे दुकान. करोनाला येथे प्रवेश करता येणार नाही कारण जागाच नाहीये. तुम्हीही पाहू शकता,” असं कॅप्शन अरुण बोथरा यांनीही या व्हिडीओला दिली होतं. कमी वेळात हा व्हिडीओ एक हजारांपेक्षा जास्त सोशल मीडिया युजर्सनी रिट्विट केला असून सहा हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. कडक सॅल्यूट! रुग्णवाहिकेचा अभाव, २ रिक्षाचालकांनी तब्बल २०० रुग्णांना हॉस्पिटलला पोहचवलं