सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्याकडे निवडणुका म्हटले की आश्वासने आली. अनेक आश्वासने अशी असतात ती कधी पूर्ण होत नसतात. सोशल मीडियावर सध्या असंच एका निवडणुकीतील आश्वासनपत्र व्हायरल झाले आहे. यातील आश्वासने वाचून अनेकांना धक्काच बसला आहे. या आश्वासन पत्रात उमेदवाराने गावात तीन विमानतळ, मोफत दारु, पेट्रोल २० रुपये लीटर अशी आश्वासने दिली आहेत.
हे आश्वासनपत्र हरियाणा येथील सिरसाध या गावचे आहे. या गावात सध्या सरपंचपदाची निवडणूक सुरू आहे. यात एका उमेदवाराने आश्वासनपत्र छापले आहे. हे आश्वासनपत्र चर्चेचा विषय झाले आहे.
हे आश्वासनपत्र पोलीस अधिकारी अरुण बोथरा यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. यात अनेक आश्वासने दिली आहे. या पोस्टरमधील उमेदवाराचे नाव जयकरण लठवाला असं आहे. यात त्यांनी १३ आस्वासनांची यादी दिली आहे. याच गावात मोफत दारु, ३ विमानतळे, महिलांसाठी मोफत मेकअप कीट असी अनेक आश्वासन दिली आहेत.
Optical Illusion: महिलेचा चेहरा कोणत्या बाजूने आहे? बरोबर उत्तर देण्यात व्हाल कन्फ्यूज
ही आहेत आश्वासन
१) रोज सरपंचाचा मन की बात कार्यक्रम.२) गावात तीन विमानतळ उभारणार.३)महिलांसाठी मोफत मेकअप किट देणार.४) गावात पेट्रोल २० रु.५) गॅसची किंमत १०० रुपये प्रति सिलेंडर करणार.६) सिरसाड ते दिल्ली मेट्रो.७) जीएसटी बंद करणार .८) प्रत्येक कुटुंबासाठी एक दुचाकी मोफत देणार.९) मोफत वाय-फाय सुविधा.१०) व्यसनींना रोज एक बाटली दारू देणार.
ही आश्वासने वाचून अनेकांना धक्काच बसला आहे. अनेकांनी या पोस्टला कमेंट केल्या आहेत. हे सरपंच निवडणुकीसाठी उभारले आहेत की, पंतप्रधानपदासाठी अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टरमध्ये 'सरसाड गावातील सरपंच पदाचा भावी उमेदवार, सुशिक्षित, कष्टाळू, कष्टाळू, प्रामाणिक उमेदवार भाई जयकरण लथवाल यांनी काम केले आहे, काम करतील आणि जनतेचा आदर करतील, असंही पुढे लिहिले आहे.