कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांची नोकरीसुद्धा गेली आहे. अनेक ठिकाणी नोकऱ्या गेल्यानं लोकांनी स्वतःचा व्यवसाय किंवा लहान मोठं उत्पन्न मिळवून देत असलेल्या धंद्याची सुरूवात केली आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत घर चालवण्यासाठी तसंच पोट भरण्यासाठी पैसे मिळवण्याशिवाय पर्याय नाही. अनेक शिक्षकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे.दरम्यान विद्यार्थांबाबत सकारात्मक घटना समोर आली आहे.
कर्नाटकातील शिराहट्टी कॉलेजमध्ये काही मुलांना एडमिशन घेता आलं नाही. कारण लॉकडाऊनमध्ये त्यांच्या घरची परिस्थिती बिकट होती. अशा स्थिती कॉलेजमधील शिक्षकांच्या टीमनं या मुलांची मदत केली आहे. जी मुलं एडमिशन घेण्यासाठी पैसे भरू शकत नव्हती अशा मुलांसाठी कॉलेजच्या स्टाफकडून पैसै जमा केले आणि ५० गरजू विद्यार्थांची फी भरली आहे.
FM Dabali Arts कॉलेजच्या शिक्षकांनी मिळून पहिल्या आणि द्वितीय वर्षाच्या मुलांच्या फीची रक्कम भरली आहे. या ५० मुलांचे आई वडिल मजूरीचं काम करतात. लॉकडाऊनमध्ये हे काम बंद असल्यानं त्यांना मुलांची कॉलेजची फी भरणं शक्य नव्हतं. शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.
'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र
शरनू या विद्यार्थ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ''माझे आई वडिल मजुरीचं काम करतात. मी सुद्धा हातभार लावण्यासाठी जे मिळेल ते काम करतो. सध्या कॉलेजची फी भरण्यासाठी ३ हजार रुपयांची आवश्यकता होती. इतके पैसे मी आणि माझ्या घरातील लोक देऊ शकत नव्हते. म्हणून मी पुढे शिकण्याचा विचार मनातून काढून टाकला होता. आज शिक्षकांनी आमची फी भरल्यामुळे मी एडमिशन घेऊ शकतो. मला या शिक्षकांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत.''
'या' वयातच वाढलेलं वजन कमी करा; अन्यथा गंभीर आजारांसह मृत्यूचा वाढेल धोका
कॉलेजच्या व्यवस्थापकीय विभागातील शिक्षिक व्हाय एस पाटिल यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक विद्यार्थी या दरम्यान वर्गात येत नाहीत कारण आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ही मुलं रोज कामाला जात आहेत. अशा स्थितीत त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत. या कामाबद्दल विदयार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून पालकांमध्ये समाधानाची भावना आहे.