जंगलातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Viral) चर्चेचा विषय ठरत आहे. यात बिबट्या (Leopard and baby impala) आपल्या शिकारसोबत खेळताना दिसत आहे. लोक हा फोटो बघून हैराण झाले आहेत की, असं कसं होऊ शकतं. हरिण तर तसं पुढे धावत असतं आणि बिबट्या त्याच्या मागे असतो. पण या फोटोत वेगळाच खेळ सुरू आहे.
@JeffreyMWard ने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यात बघितलं जाऊ शकतं की, हरणाचं पाडस बिबट्यासमोर उभं आहे. बिबट्याने आपला एक पंजा त्याच्या मानेवर ठेवला आहे. बघताना असं वाटतंय बिबट्या हरणाच्या पाडसाला काहीतरी सांगत आहे किंवा समजावत आहे. जणू बिबट्याने मित्राच्या खांद्यावर हात ठेवलाय. (हे पण वाचा : Viral Video : फोटो काढत होती महिला, तेव्हाच १८० च्या स्पीडने जिराफ लागला मागे आणि मग..)
हा फोटो पाहून जर तुम्हाला वाटत असेल की, बिबट्या हरणाच्या पाडसासोबत मैत्री केलीये, तर तुम्हाला चुकीचं वाटतंय. कारण अनेकदा शिकारी आपल्या शिकारसोबत असं वागताना बघायला मिळतात. हा फोटो २०१९ मध्ये क्लिक करण्यात आला. हा फोटो साऊथ आफ्रिकेतील Greater Krugur National Park चा आहे. हा फोटो काढलाय Reynard Moolman याने.
नंतर शिकारने आपला जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो काही वाचू शकला नाही. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर मीम्सही तयार केले आहेत.