आपल्या सर्वांना माहिती आहे की जंगलातील जग अतिशय वेगळं असतं. इथे प्रत्येक प्राण्याला सतत सावध राहावं लागतं. कारण इथे प्रत्येक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात दिसतं की एका बिबट्याने हरणाची शिकार करण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हरण तलावातील पाण्यात अतिशय आरामात उभा आहे. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की त्याला आपल्या आसपास असलेल्या धोक्याची चाहूल लागलेली आहे. याच कारणामुळे ते एकटक आपल्या आजूबाजूला पाहत आहे. इतक्यात एक बिबट्या झाडीतून बाहेर येतो आणि हरणावर हल्ला करतो. यानंतर हरण आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतं.
हा हैराण करणारा व्हिडिओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी साकेस बडोला यांनी आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शन दिलं, की धोका कधीही आणि कुठेही असू शकतो. त्यामुळे नेहमी सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरनं म्हटलं, की हा व्हिडिओ पाहून माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मला वाटतंय की बिबट्याने हरणाची शिकार केलीच असेल. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.