सोशल मिडियावर प्राण्यांचे विविध व्हिडिओ पाहिले असतील. त्यातही जंगली प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडिओ तर अंगावर काटा आणणारे असतात. बिबट्या हा अतिशय चपळ अन् हिंस्त्र प्राणी. एकदा का तो एखाद्या शिकारीच्या मागे लागला की शिकार करुनच शांत होतो. तुम्ही बिबट्याचे हरणांची शिकार करतानाचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण कधी हरणाची हवेत शिकार करतानाचा व्हिडिओ पाहिला आहे का? हा थरार तुम्हाला पहायचा असेल तर पुढील व्हिडिओ पाहाच...
हा व्हिडिओ आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ ४२ हजार पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ तुफान आवडला आहे. यावर त्यांनी निरनिराळ्या कमेंट्स करत उस्फुर्तपणे शेअरही केला आहे.
व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की हरणांचा कळप झाडीझुडपातून वेगाने पळत येत आहे. दुसऱ्याच क्षणाला आपल्याला त्यांच्या मागे धावणारा बिबट्या दिसतो. जीवाच्या आकांताने ही हरण पळत आहेत. इतक्यात एक हरण उंच उडी मारते आणि तितकीच उंच उडी मारुन बिबट्या त्या हरणाची हवेत शिकार करतो.
हा धडकी भरवणारा व्हिडिओ पाहुन अनेकांच्या तोंडच पाणी पळालं आहे. एकाने लिहिलंय 'मिलियन डॉलर शॉट' तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलंय की आपल्याला आपले लक्ष्य साध्य करावेच लागते मग भले कितीही अडचणी आल्या तरीही...