लॉकडाऊन दरम्यान जंगलातील प्राणी शहरांमधील रस्त्यावर पोहोचल्याचे कित्यके व्हिडीओ आपण बघत आहोत. कुठे हत्ती आले आहेत, कुठे मोर आले आहेत तर कुठे हरिण आले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून त्यात एक बिबट्या आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ हैद्राबादचा आहे. यात बिबट्याने आधी एका व्यक्तीवर आणि नंतर कुत्र्यांवर हल्ला केला.
या व्हिडीओत बिबट्याने एका व्यक्तीच्या मागे लागलेला दिसतो. मात्र, सुदैवाने ती व्यक्ती आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरते. तो एका ट्रकमध्ये शिरतो आणि जीव वाचवतो. नंतर बिबट्या एका घरात शिरण्याचा प्रयत्न करतोय. अशात तिथे काही कुत्रे बिबट्याला घेराव घालतात.
परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'भारतात कुठे बिबट्या आणि कुत्र्यांची लढाई होणं हे काही नवीन नाही. अनेकदा कुत्रे बिबट्याशी पंगा घेतात. बिबट्यांना संधी मिळेल तेव्हा हॉट डॉग्स आवडतात'.
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे काही नक्की समजू शकले नाही. पण काही यूजर्सनी दावा केला आहे की, हा व्हिडीओ हैद्राबादचा आहे. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.