Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हे प्राणी शिकार करताना दिसतात तर कधी जंगलात सहज फिरताना दिसतात. सामान्यपणे लोक काही जंगली प्राण्यांपासून दूरच राहतात. जसे की, वाघ, बिबट्या, सिंह. पण एका व्यक्तीचा बिबट्यांसोबतचा व्हिडीओ सध्या सगळ्यांना थक्क करत आहे. व्हिडिओत जे दिसतं ते बघून सहजपणे तुमचाही विश्वास बसणार नाही.
या व्हिडिओत एक व्यक्ती ब्लॅंकेट घेऊन झोपलेली आहे. तेव्हाच काही तीन बिबटे त्याच्याजवळ येऊन झोपू लागतात. बिबटे व्यक्तीला चिकटून त्यांच्या अंथरूणावर झोपताना दिसत आहेत. महत्वाची बाब बिबट या व्यक्तीला काही नुकसानही पोहोचवत नाहीयेत. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, "एका जंगलातील गावात बिबटे एका वृद्ध व्यक्तीजवळ येऊन झोपत होते. जेव्हा वन्यजीव विभागाला समजलं तर त्यांनी तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जो बघून लोक अवाक् झाले आहेत.
बघू शकता की, बिबटे आधी व्यक्तीच्या बाजूला झोपले होते. त्यानंतर व्यक्तीला चिकटून त्यांच्या ब्लॅंकेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. व्यक्तीही बिबट्यांना आपल्या लेकरांप्रमाणे प्रेमाने जवळ घेऊन झोपत आहे. मनुष्य आणि प्राण्यांमधील हे प्रेम थक्क करणारं आहे.
मात्र, व्हिडिओत देण्यात आलेली माहिती पूर्णपणे बरोबर नाही. Daily Paws वेबसाईटनुसार, हा व्हिडीओ साऊथ आफ्रिकेतील आहे आणि साधारण २ ते ३ वर्ष जुना आहे. यात दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव डॉल्फ सी वॉल्कर आहे. त्याना 'चीता विस्परर' नावानेही ओळखलं जातं. डॉल्फ जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करतात.