जंगलातील नियम अतिशय वेगळे असतात. इथे एका प्राण्याला जिवंत राहायचं असेल तर कोणाला ना कोणाला आपला जीव गमवावाच लागतो. मात्र, इथे शिकारी स्वतःच कधी शिकार बनेल, हे सांगणंही कठीण आहे. जंगलाच्या दुनियेत चित्त्याला अतिशय क्रूर शिकारी समजलं जातं. चित्ता डोळ्याची पापणी उघडण्याच्या आत एखाद्या प्राण्याची शिकार करतो. मात्र, सिंह तर सिंह आहे. सिंहाच्या समोर कोणाचंही चालत नाही. याच कारणामुळे त्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सोशल मीडियावर सध्या जंगलातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video of Wild Animals) होत आहे. यात एक सिंह चित्त्यावर हल्ला (Lion Attacks on Cheetah) करताना दिसतो. यानंतर चित्त्याची काय अवस्था होते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.
चित्ता आणि सिंह हे दोन्ही प्राणी अतिशय हिंस्त्र आहेत. हे प्राणी डोळ्याच्या पापणी मिटण्याच्या आत एखाद्याची शिकार करतात. मात्र, अनेकदा हे दोन्ही प्राणीच आपसात भिडतात. या लढाईत नेमकं कोण जिंकेल, हा अंदाज लावणंही कठीण असतं. मात्र, सिंहाच्या तावडीत सापडल्यास त्यातून वाचणं जवळपास अशक्यच असतं. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन सिंह एका चित्त्याच्या मागे धावताना दिसतात. यादरम्यान एक सिंह चित्त्यावर हल्ला करतो. तो चित्त्याची मान आपल्या जबड्यात पकडतो. व्हिडिओ पाहून असं जाणवतं, की चित्त्याचं सिंहाच्या तावडीतून वाचणं अशक्य आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wild_animals_creation नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड झाल्यापासून आतापर्यंत २ लाख २९ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.
व्हिडिओमध्ये चित्त्याची झाल्याची अवस्था पाहून अनेकजण दुःखी आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे, की हा चित्ता नक्कीच आजारी असेल. अन्यथा सिंहांमध्ये इतकी हिंमत नाही, की ते चित्त्याचा पाठलाग करून त्याला पकडतील. तर काहींचं असं म्हणणं आहे, की चित्त्यावर सिंहाने अशाप्रकारे हल्ला केल्याचं अतिशय कमी वेळा पाहायला मिळतं, कारण चित्ता अतिशय चपळ असतो.