सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं कारण त्याची मेंटॅलिटी त्याला जंगलाचा राजा बनवते. तसं बघायला गेलं तर ताकद तर हत्तीमध्ये जास्त असते, पण सिंह जास्त संयमी आणि फोकस असतो. त्यामुळेच तो जंगलाचा राजा असतो. आपल्या शिकारीबाबतही सिंह इतर प्राण्यांपेक्षा दृढनिश्चयी असतो. जर तो शिकारीला निघाला तर शिकार करूनच परत येतो. एका मेल आफ्रिकन सिंहाने जंगली डुकराला त्याच्या बिळातून काढण्यासाठी सात तास खड्डा खोदला.
@WildCaptured ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सिंह पूर्णपणे चिखलात माखलेला दिसतो आहे. तो खड्ड्यात तोंडावर पडतो सुद्धा पण खोदकाम काही थांबवत नाही. हा व्हिडीओ Maasai Mara National park मधील आहे. हा पार्क केनियाची राजधानी नैरोबीमध्ये आहे.
या फोटोंमध्ये तुम्ही सिंहाची मेहनत बघू शकता. तो आपल्या शिकारीला मिळवण्यासाठी मेहनत करत आहे. जंगली डुक्कर हे आपलं स्वत:चं बिळ बनवत नाहीत. ते दुसऱ्या प्राण्याला मारतात आणि त्याच्या बिळावर ताबा मिळवतात. सिंह त्यात डुकराला शोधत आहे.
सात तासांच्या मेहनतीनंतर अखेर सिंहाला त्याचं फळ मिळालं. त्याने आपल्या शिकारीची मान तोंडात धरली आहे. हे फोटो Suhaib Alvi यांनी कॅप्चर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओवरून हे समजून येतं की, एका सिंहाला आपल्या शिकारीसाठी किती मेहनत करावी लागते.