Lion Video : अनेकदा जंगलातील हिंस्र प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात रहिवासी भागात येतात. तुम्ही अनेकदा अशा प्रकारच्या बातम्या पाहिल्या असतील. सध्या गुजरातमधून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत चक्क जंगलाचा राजा सिंह रहिवासी भागात शिरल्याचे दिसत आहे. सिंहाला पाहून तिथे उपस्थित अनेकांचा थरकाप उडतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
या व्हिडिओमध्ये सिंह गावातील रस्त्यावर फिरताना दिसत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, सिंह रस्त्यावर आला तेव्हा तिथे महिला अन् लहान मुलांसह अनेकजण उपस्थित होते. सिंहला पाहून अनेकजण दूर पळून जातात आणि त्याचा व्हिडिओ शुट करायला लागतात. हा व्हिडिओ इन्स्टा पेज @wildtrails.in नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओ पहा:-
अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ गुजरात राज्यातील गीरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंह गावातील रहदारीच्या रस्त्यावरुन आपल्या राजेशाही थाटात चालताना दिसत आहे. सिंहाला पाहून तिथे उपस्थित लोक जीव वाचवण्यासाठी सिंहाच्या मार्गातून बाजूला होतात. विशेष म्हणजे, सिंह कुणालाही इजा न पोहोचवता शांतपणे चालताना दिसतोय.
गुजरातच्या रस्त्यावर सिंह कसे येतात?गुजरातमधील गीर प्रदेश हे आशियाई सिंहांचे एकमेव नैसर्गिक निवासस्थान आहे. गिर राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध. हे जुनागड, अमरेली आणि गीर सोमनाथ जिल्ह्यांमध्ये पसरलेले असून, 1,412 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. सिंह, बिबट्या, हरीण, नीलगाय, चिंगारा, सांबर याशिवाय तीनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती येथे आहेत. गुजरातमधील गीर भागात जंगल आणि निवासी क्षेत्रांमधील अंतर कमी असल्यामुळे सिंह रस्त्यावर दिसतात.