सिंहांच्या तोंडासमोर तुम्हाला मांसाचेच तुकडे पडलेले दिसतील. तुम्ही कधी सिंहाच्या तोंडासमोर कलिंगडाचे तुकडे बघितले आहेत का? हे तुकडे फक्त तिथे पडलेले नाहीत तर सिंह चक्क मांस सोडून कलिंगडावर ताव मारतायत. खरं वाटत नसेल तर पाहा व्हिडिओ...
आपल्याला रसरशीत, लालबुंद कलिंगड दिसलं तर साहाजिकच ते खायचा आपल्याला मोह होतो. मात्र या व्हिडिओत चक्क सिंह कलिंगडावर ताव मारतायत. फक्त सिंहच नाही तर, अस्वल, हत्ती हे प्राणीही कलिंगड खाताना दिसत आहेत. एरवी एकमेकांची शिकार करताना दिसणारे हिंस्र, मांसाहारी प्राणीसुद्धा अगदी हौसेने गोड गोड कलिंगडाचा आस्वाद घेत आहेत. Oregon Zoo या अकांऊटवरन ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याला आतापर्यंत ८३ हजारापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.