शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

Vira Video: मस्त summer vacation एंजॉय करतेय सिंहाची फॅमिली, पाहा झाडावर काय करतायत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 4:56 PM

उन्हाळ्याची सुट्टी काय फक्त माणसांनीच एंजॉय करायची असते असं नाही. प्राण्यांनाही तो हक्क आहे. याचा प्रत्यय सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरून येत आहे. टांझानियातल्या एका पार्कमध्ये काही सिंहिणी समर हॉलिडे एंजॉय करताना दिसत आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही काय करता? फिरत असाल , खेळत असाल आणि मजा करत असाल...आणि झोप? सध्या तर ऊन इतकं वाढलं आहे, की घरात मस्त पडून राहावंसं वाटतं. जंगलचा राजा सिंहही (Lion) याला अपवाद नाही. उन्हाळ्याची सुट्टी काय फक्त माणसांनीच एंजॉय करायची असते असं नाही. प्राण्यांनाही तो हक्क आहे. याचा प्रत्यय सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरून येत आहे. टांझानियातल्या एका पार्कमध्ये काही सिंहिणी समर हॉलिडे एंजॉय करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ आहे टांझानियामधल्या सेरेनगटी नॅशनल पार्कमधला (Serengeti National Park, Tanzania). भारतीय वन अधिकारी (IFS) सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी आजच (९ एप्रिल) हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर एक ते दीड तासाभरातच याला साडेसात हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज आणि ८७० पेक्षा जास्तलाइक्स मिळाले आहेत. नंदा असे अनेक इंटरेस्टिंग व्हिडीओज पोस्ट करत असतात. त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो.

या व्हिडीओमध्ये एका झाडावर काही सिंहिणी मस्त आराम करताना दिसताहेत. एक दोन नाही, तर चांगले पाच ते सात सिंह या झाडाच्या फांद्यांवर गाढ झोपलेले आहेत. बाजूने एक हत्ती फिरतोय; पण कशाचाही या सिंहावर परिणाम होताना दिसत नाही. सगळं विसरून झाडावर शांत निद्रा घेत हे सिंह पहुडलेले आहेत. व्हिडीओमधून बघायला जितकं इंटरेस्टिंग वाटतंय, तितकं अर्थात प्रत्यक्ष बघताना नक्कीच घाबरगुंडी उडेल. कारण एक नाही तर इतके सिंह आणि तेही एकत्र, भले झोपलेले असले तरी त्यांची दहशत त्यामुळे काही कमी होत नाही.

या व्हिडीओला नंदा यांनी दिलेली कॅप्शनही इंटरेस्टिंग आहे. ‘Nobody can bring you peace but yourself’ असं त्यांनी लिहिलं आहे. म्हणजेच तुम्हाला हवी असलेली शांतता फक्त तुम्हीच स्वत:ला मिळवून देऊ शकता, बाकी कोणी नाही, असा याचा अर्थ होतो. हे अगदी खरं आहे. बाहेरच्या रणरणत्या उन्हातही शांत झोपलेल्या या प्राण्यांकडून माणसानं शिकण्यासारखी ही गोष्ट आहे. बाहेर काहीही झालं तरी त्याचा तुमच्या घरावर, मनावर किती परिणाम करून घ्यायचा हे शेवटी तुमच्या हातात असतं. तो परिणाम जितका कमी होईल तितकी तुम्हाला शांत झोप लागेल आणि तुमचं जगणंही आनंददायी होईल

रिडल स्मिथचा हा व्हिडीओ सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. वनाधिकारी असल्यामुळे नंदा यांना वन्यजीवांविषयी विशेष प्रेम असणं साहजिकच आहे. या वन्य जगातले अनेक इंटरेस्टिंग व्हिडीओज ते नेहमीच शेअर करत असतात.  आता आपल्याकडेही उन्हाळा चांगलाच जाणवत आहे. बाहेरच्या जगाची विनाकारण चिंता करत फिरण्यापेक्षा या जंगलचा राजाचा आदर्श घेऊन एक मस्त झोप घ्या. कदाचित आणखी ताजेतवाने व्हाल!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर