या लहान मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पहिल्या नजरेत पाहिल्यावर असं दिसतं की, ही मुलगी एखाद्या आजाराने पीडित आहे त्यामुळे तिचे पाय कमजोर दिसताहेत. पण असं अजिबातच नाहीये. ते म्हणतात ना दिसतं तसं नसतं...हेच इथे लागू पडतं. या फोटोतील झोल समजून घेण्यासाठी फोटो तुम्हाला व्यवस्थित बघावा लागेल.
हा फोटो Christopher Ferry नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या फोटोत ऑप्टिकल इल्यूजन निर्माण होतंय. ज्या लोकांच्या हे लक्षात आलंय त्यांनी हा फोटो शेअर केलाय. आतापर्यंत २ हजार लोकांनी हा फोटो शेअर केलाय.
मुळात फोटोकडे पाहिल्यावर ऑप्टिकल इल्यूजन होतंय. म्हणजे प्रथम दर्शनी असं वाटतं की, या मुलीचे पाय फारच बारीक आहेत. पण तसं नसून तिने पॉपकॉर्नचं पॅकेट हाती धरलं आहे. पण हे पॉपकॉर्नचं पॅकेट जमिनीच्या रंगाचं असल्याने दिसून येत नाही.