तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरबांगुली बेअरडेमुकामेडॉव यांचा एक फोटो सोशल मीडियात फारच व्हायरल झाला आहे. तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींना घोड्यांची फारच आवड आहे. किती ती या फोटोवरून तुम्हाला कळेलच.
आता देशातील लोक लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. अशात लोकांचा चांगला वेळ जावा म्हणून Shaun Walker ने गुरबांगुली बेअरडेमुकामेडॉव यांचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'आजचा क्वारंटाईन गेम: या फोटोत किती घोडे आहेत? मला 13 सापडले. यात आणखीही आहेत'. या फोटोत किती घोडे आहेत याचं उत्तरही दिलं आहे पण तुम्ही न शोधताच ते वाचलं तर यात मजा काय ना? तुमचा वेळ कसा जाईल.?
आता तुमच्याकडे घोडे शोधायला वेळ नाही हे तुम्ही म्हणू शकत नाही. फक्त लागेल काय तर चांगली नजर. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर चांगली आहे तर चला लागा कामाला. आता म्हणाल की, काय मिळणार? तर तुम्हाला मिळणार आनंद आणि तुमची नजर चांगली असल्याचा पुरावा. चला लागा कामाला....
आता कुणी याचं उत्तर देताहेत 15 तर कुणी देताहेत 16. पण खरंच या फोटोत किती घोडे आहेत हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल.
मुळात या फोटोतील सगळे घोडे शोधून झाले तरी न दिसणारेही अनेक घोडे आहेत. ते धरून यातील घोड्यांची संख्या होते 9,736 इतकी. आता बोला....