कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जास्तीत जास्त लोकांना कोरोना पासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना प्रचंड संकटाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अडकून राहिलेल्या कामगारांनी आपल्या कुटुंबासह घरची वाट धरली आहे. त्यामुळे शेकडो हजारो किमी पाई प्रवास करताना प्रवासी मजूर दिसून येत आहेत.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पायी चालून चालून थकलेला एक चिमुकला बॅगवरच झोपी गेला आहे आणि त्याची आई ही बॅग ओढत नेताना दिसून येत आहे. हा फोटो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या परिस्थितीत या लहानग्याची काय चुक असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. हा व्हिडीओ अरविंद चौहान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (Video : लॉकडाऊनमध्ये चपाती बनवताना झाली अशी काही दशा; सोशल मीडियावर चांगलाच पिकलाय हशा)
या व्हिडीओत दिसणारे मजूर पंजाबवरून झांसीला आग्रामार्गे पायी जात आहेत. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होताना दिसून येत आहे. या फोटोमधील लहान मुलगा पायी चालून चालून थकला आहे. म्हणून त्याच्या आईने प्रवास थांबू नये म्हणून बॅगचा आधार घेतला आहे. ही ट्रॉल खेचून आई आपल्या मार्गाच्या दिशेने पुढे चालत आहे. (लॉकडाऊनमध्ये आपल्या नजरेला ताण देऊन बघा; दिसतेय का जंगलात लपलेली मनीमाऊ?)