कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता भारतातील सगळ्यात ठिकाणी लोकांचा वावर पूर्णपणे बंद आहे. अशी परिस्थिती या आधी कधीही आली नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी या काळात घडताना दिसून येत आहे. माणसांना या लॉकडाऊनचा प्रचंड कंटाळा आला आहे. प्राण्यांची मात्र सध्या खूप मौजमजा पहायला मिळत आहे. सामसुम रस्ते, रस्त्यांवर कोणीही नाही. हे पाहून माणसांना घाबरून लांब पळत असलेल्या प्राण्यांनी रस्त्यावर मुक्त संचार करायला सुरूवात केली आहे. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये एक माकड चक्क पतंग उडवताना दिसून येत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. एका घराच्या गच्चीवर माकड मस्त पतंग उडवताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. माकड पतंगाचा धागा आपल्या हातांनी खेचत आहे. हे दृश्य पाहणारे लोक मागून हसत आहेत. या फोटोला आयएफएस सुशांत नंदा यांना कॅप्शन दिलं आहे की लॉकडाऊनच्या काळात खूप लवकर विकास होत आहे. म्हणून माकडं पतंग उडवत आहेत. या व्हिडीओत माकड पतंग उडवताना दिसत असलं तरी काही लोकांनी पतंग उडवणारं माकडंच आहे. हे मान्य करण्यास नकार दिला आहे.