सध्या सोशल मीडियावर अनेक ऑनलाईन गेम आल्या आहेत. यातून एनेकजण पैसे मिळवतात. पण, काहीजण लाखो रुपये गमवतातही. अशीच एक घटना समोर आली आहे. एका ई-कॉमर्स कंपनीत काम करणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाला ऑनलाइन रमी गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. त्याने केवळ आपल्या आयुष्याची कमाईच जुगार खेळली नाही तर चार बँकांकडून कर्जही घेतले आणि गेममध्ये संपूर्ण रक्कम गमावली. त्यांच्या या छंदामुळे त्यांचे कुटुंबही उद्ध्वस्त झाले. त्यांची पत्नी आणि मुलगी घर सोडून गेली आणि त्यांची नोकरीही गेल्याची घटना समोर आली आहे.
कोण जिंकतं यानं फरक पडत नाय...", CSKचा पराभव अन् चाहत्यांकडून धोनीचं 'ते' ट्विट व्हायरल
या गेममध्ये ५० लाखांहून अधिकचे नुकसान झालेल्या या व्यक्तीने गुरुवारी आत्महत्या करण्यासाठी नोएडातील सेक्टर 3 येथील गेम कंपनीचे कार्यालय गाठले. सरकारने ऑनलाईन फसवणुकीचा खेळ थांबवला नाही तर त्याला स्वतःला आत्महत्या करायची किंवा किडनी विकून कर्ज फेडावे लागेल, असे या तरुणाने ट्विटमध्ये लिहिले आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून आत्महत्या करण्याची घोषणा केली. नैनितालच्या हल्द्वानी येथे राहणारा हरीश गेल्या अनेक वर्षांपासून प्रल्हादपूर, ओखला, दिल्ली येथे राहतो. तो दिल्लीतील एका ई-कॉमर्स कंपनीत कामाला होता.
सुमारे तीन वर्षांपूर्वी, त्याला ऑनलाइन रम्मी खेळण्याची आवड निर्माण झाली, त्याला सतत रम्मी खेळून पैसे कमवायचे होते. या गेममध्ये तो पाच वेगवेगळ्या खेळाडूंसोबत खेळायचा. खेळाचा नियम ९० टक्के पैसे विजेत्याकडे आणि १० टक्के कंपनीकडे जातील असा नियम या गेमचा आहे, तो गेममधील एकही बेट जिंकला नाही. पूर्वी तो थोड्याफार रकमेने खेळायचा, पण प्रत्येक वेळी तो हरवू लागला तेव्हा त्याने हरवलेले पैसे एकाच फटक्यात कमवायचे ठरवले. पगार न मिळाल्याने त्याने चार वेगवेगळ्या बँकांकडून २२ लाखांचे कर्ज घेतले आणि सर्व पैसे बुडाले. त्याचे आधीच सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. यामध्ये एकूण ५२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आता हरीशची नोकरीही कर्जाच्या ओझ्याखाली गेली आहे, जवळपास दीड वर्षांपासून हप्ते न भरल्याबद्दल बँकेकडून वसुलीच्या नोटिसा येत आहेत. त्याचे पैसे परत मिळावेत म्हणून तो दिवसभर सेक्टर-3 कंपनीबाहेर भीक मागत आहे.
हरीशच्या लग्नाला जवळपास पाच वर्षे झाली होती. त्याला दोन मुली आहेत. हरीशला या खेळातून बाहेर पडण्याचा सल्ला पत्नी नेहमी देत होती, पण एका झटक्यात पैसे कमवण्याचा त्याचा लोभ इतका वाढला की तो सर्व काही विसरला. सुमारे दीड वर्षापूर्वी त्याची पत्नी आणि मुलं त्याला सोडून गेले. हरीशला वडील नाहीत, कुटुंबातील इतर सदस्य उत्तराखंडमध्ये राहतात.
खेळ बंद करण्याचे आवाहन करा
कर्ज फेडण्यासाठी हरीशने ट्विटरवर एबी पॉझिटिव्ह रक्तगट सांगून किडनी विकण्याचे ट्विट केले आहे. सरकारने ऑनलाइन फसवणुकीचा खेळ थांबवला नाही, तर स्वत: आत्महत्या करण्याची किंवा किडनी विकून कर्ज फेडावे लागेल, असे या तरुणाने लिहिले आहे. 'मी आत्महत्या करणार आहे, याला रमी गेम जबाबदार आहे. या खेळामुळे मी रस्त्यावर आलो आहे, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असंही या ट्विटमध्ये लिहिले आहे.