मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मध्य प्रदेशमधील अनुपपूर जिल्ह्यातील दिवसाढवळ्या एका चोराने एका घरात चोरीचा प्रयत्न केला. यानंतर पुढ तो चोर पकडला गेला, पुढ त्या चोराने वाचण्यासाठी टोकाचे पाऊलं उचलले आहे.
चोराला घरात शिरताना शेजाऱ्यांनी पाहिले आणि घरमालकाला याची माहिती दिली. चोर तिथून पळून जाऊ नये म्हणून घरमालकाने घराचे सर्व दरवाजे बंद केले. इकडे चोरट्याला याचा सुगावा लागला आणि तेथून बाहेर पडता न आल्याने त्याने घराच्या छतावर चढून हायव्होल्टेज ड्रामा करण्यास सुरुवात केली. आरोपीने स्वत:हून निघून जाण्याची मागणी करत छताच्या रेलिंगला लटकून उडी मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.
यावेळी आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शुट केला. याची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले असता त्यांनी चोरट्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला. चोरट्याने काही काळ गोंधळ घातला. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हे प्रकरण अनुपपूर जिल्ह्यातील प्रभाग क्रमांक ११ चे आहे. अमरकंटक तिराहे येथील लवकुश गुप्ता उर्फ डब्बू यांच्या घरात अज्ञात चोरट्याने भरदिवसा प्रवेश केला. पण तो चोरी करण्यात अयशस्वी ठरतो आणि त्याऐवजी त्याला घरात कैद केले जाते. घराबाहेर पडता येत नसल्याच्या परिस्थितीत चोरट्याने घराच्या छतावर चढून हायव्होल्टेज ड्रामा सुरू केला.
गाडीच्या ब्रेकऐवजी महिलेने दाबला ॲक्सिलेटर; कारने दुकानात प्रवेश करत केलं मोठं नुकसान
स्वत:हून निघून जाण्याची मागणी करत चोर छतावर चढला आणि छताच्या रेलिंगजवळ आला. येथून तो पुन्हा पुन्हा उडी मारण्याची धमकी देत राहिला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तासाभराच्या प्रयत्नानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला पकडून खाली आणण्यात आले.
स्थानिक पोलिसांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. घराच्या सर्व खिडक्या-दारे बंद आहेत, मात्र हा चोर कोठून घरात घुसला हे अद्याप समजले नाही. कदाचित चोर घरांच्या गच्चीतून पोचले असावेत. शेजारी राहणार्या लोकांनी आम्हाला सांगितल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली, सध्या पोलिसांनी चोरट्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले असून त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती तक्रार दारांनी दिली आहे.