किटकनाशक प्यायल्याने साप बेशुद्ध पडला; पोलिसाने CPR देऊन वाचवला जीव, पाहा video...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 06:38 PM2023-10-26T18:38:53+5:302023-10-26T18:38:53+5:30
बुशुद्ध सापाला तोंडावाटे CPR देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Snake CPR Viral Video: माणूस कितीही ताकतवान असला, तरीही सापासारख्या विषारी प्राण्यासमोर जायला घाबरतो. सापाला नुसतं पाहूनच अनेकांची घाबरगुंडी होऊन जाते, तर त्याच्या जवळ जाण्याचा प्रश्नच नाही. सर्पमित्रच असतात, जे सापाच्या जवळ जायला घाबरत नाहीत. अशाच एका सर्पमित्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
व्हायरल व्हिडिओ पहा:-
A video from Narmadapuram has gone viral where a police constable is giving CPR to a snake that had fallen unconscious after being drenched in pesticide laced toxic water. pic.twitter.com/tblKDG06X6
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) October 26, 2023
सोशल नेटवर्किंग साईट X वर (@Anurag_Dwary) नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल व्हडिओ मध्य प्रदेशचा आहे, ज्यात एक पोलिस कॉन्स्टेबल अतुल शर्मा, बेशुद्ध पडलेल्या सापाचा जीव वाचवताना दिसत आहेत. यात तो पोलीस हवालदार बेशुद्ध सापाला चक्क तोंडाने CPR(कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन/ तोंडावाटे श्वास देणे) देताना दिसत आहेत.
पाणी समजून कीटकनाशक प्यायल्याने त्या सापाची ती अवस्था झाली होती. 2 मिनिट 18 सेकंदाच्या क्लिपमध्ये पोलीस कर्मचारी सापाच्या तोंडाला स्वतःचे तोंड लावून श्वास देण्याचा प्रयत्न करतोय. काही वेळाने साप पुन्हा शुद्धीवर येतो आणि तेथून सरपट निघून जातो. 26 ऑक्टोबरला शेअर केलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी कमेंट करुन त्या पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक केले.
सीपीआर म्हणजे काय?
ही एक आपत्कालीन प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एखाद्या अचानक बेशुद्ध पडलेल्या किंवा हृदय बंद पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी दोन्ही हातांनी छाती दाबली जाते. याशिवाय, त्याला तोंडावाटे कृत्रिम ऑक्सिजन दिले जाते. या प्रक्रियेत बंद पडलेले हृदय काही वेळानंतर सुरू होते.