सार्वजनिक शौचालयात अंडी अन् मटण विकून धंदा करायचा; पालिका कर्मचारी येताच झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 07:45 PM2021-01-28T19:45:06+5:302021-01-28T20:02:49+5:30
Trending Viral News in Marathi : एका सार्वजनिक शौचालयात अनेक दिवसांपासून अंडी आणि मटन विकण्याचा व्यवसाय सुरू होता.
तुम्ही आतापर्यंत सार्वजनिक शौचालयात कधीही दुकान किंवा कोणीही सामान विकणारा विक्रता पाहिला नसेल. सार्वजनिक शौचालयासारख्या अस्वच्छ जागेवर कोणी कसं काय खायच्या वस्तू विकू शकतं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सार्वजनिक शौचालयात अनेक दिवसांपासून अंडी आणि मटन विकण्याचा व्यवसाय सुरू होता.
इंदूरमधील लोहा मंडई परिसरात इंस्पेक्शच्या काळात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या सार्वजनिक शौचालयाची पाहाणी केली. त्यावेळी हा विचित्र प्रकार समोर आला. त्यानंतर या विक्रेत्यावर हजारो रुपांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयनं ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे.
Public toilet caretaker in Indore, Madhya Pradesh, found storing eggs & food items for business purposes
— ANI (@ANI) January 28, 2021
"He was found storing eggs & meat cutting instruments. He's been fined Rs 1,000 & org operating the toilet will be fined Rs 20,000," says Indore Nagar Nigam Addl Commissioner pic.twitter.com/e5QONyvrTm
दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वच्छता सर्वेक्षण २०२० साठी इंदौरमध्ये मोठ्या उत्साहात तयारी केली जात होती. पालिकेचे कर्मचारी रोज आपल्या परिसरात फिरून पाहाणी करत होते. बुधवारी लोहा मंडई परिसरातील हे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. एका सुलभ कॉम्पलेक्सजवळ अंडी आणि मासाची विक्री केली जात होती.
त्यानंतरच घटनास्थळीच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मटण व्यावसायिकाला एक हजार रुपये आणि सुलभ कॉम्प्लेक्स इन्स्टिट्यूटला २० हजार रुपये दंड ठोठावला. भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ
आयुक्त अभय राजनगांवकर यांनी सांगितले की, '' सार्वजनिक सुलभ शौचालयांची (सीटीपीटी) आवश्यक व्यवस्था पाहण्यासाठी ही टीम आली होती. लोहा मंडईमध्ये असलेल्या सुलभ कॉम्प्लेक्समध्ये केअर टेकर लोकांना मांस आणि अंड्याची विक्री केली जात होती. असा प्रकार दिसून आल्यानंतर या विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. तेरी मेहरबानिया! रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव