खाद्यपदार्थांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आवडीने पाहिले जातात. एखादा पदार्थ बनवताना त्यावर काहीतरी प्रयोग करायचा आणि नवा पदार्थ म्हणून सर्वांसमोर मांडायचा, हा जणू आता ट्रेंडच झालाय. मग या विचित्र डीश सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) ‘मॅगी पाणीपुरी’ने (Maggi panipuri) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल (Viral) व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी डोक्याला हात लावला आहे. कारण एक काळ असा होता जेव्हा लोक पाणीपुरीसाठी आंबट, गोड आणि तिखट पाणी निवडायचे. पण एका पाणीपुरीवाल्या भैयाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हे लोक पाणीपुरीत बटाट्याऐवजी मॅगी टाकून लोकांना खायला देत आहेत. हा व्हिडिओ केवळ 11 सेकंदांचा आहे, मात्र हा पाहिल्यानंतर यूझर्सचा संयम सुटत आहे. हे पाहून अनेक पाणीपुरीप्रेमींना धक्का बसला आहे.
मॅगी पाणीपुरीचा हा व्हिडिओ ट्विटरवर @Iyervval या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की खूपच त्रासदायक व्हिडिओ. लोकांनी हा स्वतःच्या जबाबदारीवर पाहावा. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ७४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एक यूझर म्हणतो, की हे इतकंही वाईट नाही. फँटा मॅगी, गुलाब जामुनचे पकोडे आणि गुलाब जामुन पराठे आजही अव्वल स्थानावर आहेत. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की हे पाहून माझी भूक मेली. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की अशा गोष्टी पाहिल्याने उलट्या होतात. याशिवाय काही यूझर्सनी अशा विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. एकंदरीत ही पाणीपुरीची फ्युजन रेसिपी पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.