शाब्बास पोरी! अवघ्या 5 वर्षांच्या 'या' चिमुकलीची बातच न्यारी; तब्बल 9 रेकॉर्ड भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:18 AM2021-08-17T10:18:50+5:302021-08-17T10:28:28+5:30

Mahalekshmi anand five year old kid bags nine record titles : महालक्ष्मीची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे की तिने पाचव्याच वर्षी 9 रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. 

mahalekshmi anand five year old kid bags nine record titles viral news | शाब्बास पोरी! अवघ्या 5 वर्षांच्या 'या' चिमुकलीची बातच न्यारी; तब्बल 9 रेकॉर्ड भारी

शाब्बास पोरी! अवघ्या 5 वर्षांच्या 'या' चिमुकलीची बातच न्यारी; तब्बल 9 रेकॉर्ड भारी

googlenewsNext

नवी दिल्ली - एका पाच वर्षांच्या चिमुकलीने कमाल केली आहे. खेळण्याच्या वयात चक्क 9 रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. यामध्ये तीन वर्ल्ड रेकॉर्ड (Kid Bags Three World Record Titles) आहेत. या चिमुकलीचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, केरळमधील कोल्लम येथे राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचं नाव महालक्ष्मी आनंद (Mahalakshmi Anand  आहे. महालक्ष्मीची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे की तिने पाचव्याच वर्षी 9 रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. 

महालक्ष्मीने तीन कॅटेगरीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तिने एका मिनिटात सर्वाधिक संशोधक आणि त्यांनी लावलेल्या शोधांची नावं सांगणं (Inventors and Inovations ), सर्वांत कमी वेळात म्हणजे 53 सेकंदांत भरतनाट्यम या नृत्यातील (Bharatanatyam Dance) सर्वांत जास्त मुद्रा करून दाखवून त्यांची नावं सांगणं तसंच 26 सेकंदांत भारतातील राज्य आणि त्यांच्या राजधान्यांची नावं सांगणं या तीन गोष्टी इतक्या कमी वेळात करून दाखवणारी ती सर्वांत कमी वयाची मुलगी आहे. 

महालक्ष्मी दीड वर्षांची असताना तिची स्मरणशक्ती जबरदस्त असल्याचं तिच्या पालकांच्या लक्षात आलं. महालक्ष्मीला आम्ही जे शिकवायचो किंवा पुस्तकातलं दाखवायचो ते ती लक्षात ठेवायची हे आमच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तिला शास्रज्ञ आणि त्यांच्या संशोधनांबद्दल शिकवलं होतं. तिनी ते सगळं स्मरणात ठेवलं. दोन दिवसांनंतर जेव्हा तिला विचारलं तेव्हाही तिनी ते तोंडपाठ म्हणून दाखवलं होतं असं महालक्ष्मीच्या पालकांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या मुलीचा खूप अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आदिथची शार्प मेमरी पाहून अनेक जण गेले भारावून

हैदराबादच्या एका चिमुकल्याने कमाल केली आहे. तल्लख बुद्धीमत्तेमुळे त्याची वर्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (World Book of Record) नोंद करण्यात आली आहे. अवघं एक वर्ष आणि नऊ महिने वय असलेल्या चिमुकल्याच्या दमदार कामगिरीने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. आदिथ विश्वनाथ गौरीशेट्टी (Aadith Vishwanath Gourishetty) असं मुलाचं नाव असून सर्वत्र त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. वर्ड बुक ऑफ रेकॉर्डसोबत आदिथच्या नावे अन्य ही अनेक रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, तेलगू बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि अन्य दोन राष्ट्रीय रेकॉर्ड्समध्ये आदिथच्या नावाची नोंद आहे. आदिथची शार्प मेमरी पाहून अनेक जण भारावून गेले आहे.
 

Web Title: mahalekshmi anand five year old kid bags nine record titles viral news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.