सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून चांगला गोंधळ बघायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेचा बहुमत सिद्ध करण्याचा कालावधी संपला. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या मदतीने सेनेचा भगवा मंत्रालयावर फडकवणार असं वाटत असतानाच सेनेला वेळेत बहुमत सिद्ध करता न आल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला. यावरूनच सोशल मीडियातून त्यांच्यावर मजेदार मीम्स व्हायरल झाले आहेत.
'तुमसे ना हो पाएगा', नेटिझन्सकडून मीम्सद्वारे सेनेची खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 12:46 PM