आज देशभरात महाशिवरात्रीचा सण लोक उत्साहात साजरा करत आहे. सगळीकडे लोक 'हर हर महादेव' चा जयघोष करताना दिसून येत आहे. याचेच औचित्य साधून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी इंस्टाग्रामवर आपले खास फोटो शेअर केले आहेत. या माधमातून त्यांनी देशभरातील लोकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पवित्र दिनी प्रियांका गांधींनी भगवान शिवाची मंदिरात जाऊन पूजा केली आहे.
आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रियांका गांधी यांनी महामृत्यूंजय मंत्र (Mahamrityunjaya Mantra) लिहीला आहे. या मंत्राला त्र्यंबकम मंत्र (Rudra Mantra or Tryambakam Mantra) या रुपातही ओळखलं जातं. महामृत्युंजय मंत्र ऋग्वेदातील एक भाग आहे. भगवान शीवाला रुद्राच्या उपकथेत द थ्री-आइड वन' नावानं ओळखलं जातं. प्रियांका गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व देशवासियांना शुभेच्छा. भगवान शिव तुम्हा सगळ्यांना आशिर्वाद देवो. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान काशीमध्ये भोलेनाथांचे दर्शन करण्यासाठी सकाळपासून काशी विश्वनाथांच्या मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाढती गर्दी पाहता प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्थाही केली आहे. याव्यतिरिक्त देशात अनेक भागांमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता विशेष काळजी घेतली जात आहे. अनेक मंदिरांमध्ये रात्रीचा रुद्राभिषेक सुरू झालेला पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मिरवणूक काढली गेली नाही. ब्रिटनमध्ये सापडलेलं उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ; 'असा' होणार पृथ्वीवरील जीवनाचा खुलासा, पाहा व्हिडीओ
दिल्लीतील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिरात भक्तांची रांग पाहायला मिळाली. शिवलिंगावर अभिषेक करून लोक आशिर्वाद घेत आहेत. आंध्रप्रदेशातील चित्तूरमधील श्रीकालहस्ती स्वामींनी लोकांना दर्शन दिले आणि महाशिवरात्रीच्या वार्षिक ब्रम्होत्सव दरम्यान वाहनांसह मिरवणूकीत सहभागी झाले. महाराष्ट्रातील दक्षिण काशीच्या मंदिरातही लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली. उज्जैन महाकाल मंदिरात ब्राम्हण भगवान शिवाला अभिषेक करताना दिसून आले. काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....