(Image Credit : SHANGYOU NEWS/WEIBO)
उत्तर-पूर्व चीनच्या मुडानजिआंग शहरात एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती ऑफिसला जाताना घरातील डेस्कटॉपचा कॅमेरा बंद करायला विसरला, पण नंतर जेव्हा त्याने डेस्कटॉपचा वापर केला तेव्हा कॅमेरातील कैद फुटेज पाहून त्याला धक्का बसला. त्याची पत्नी त्याच्याच एका मित्रासोबत आक्षेपार्ह स्थितीत कॅमेरात कैद झाली होती.
ही घटना यांग या व्यक्तीसोबत घडली. त्याने सांगितले की, हा व्हिडीओ २०१६ मध्ये रेकॉर्ड झाला होता. पण व्हिडीओ समोर आल्यापासूनचं त्याने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार तयारीही सुरु केली होती. २०१८ मध्ये व्यभिचारपूर्ण व्यवहाराचा आरोप करत दोघांचा घटस्फोट झाला.
यांगने या घटनेबाबत मीडियाला माहिती देताना सांगितले की, त्या दिवशी त्याला वाटले होते की त्याचा सिस्टम कॅमेरा खराब झाला आहे, त्यामुळे त्याने तो बंदच केला नाही. पण कॅमेरा सुरुच होता. ज्यात त्याची पत्नी आणि त्याचा जवळचा मित्र अश्लिल वर्तन करताना रेकॉर्ड झालेत.
यांगने आरोप लावला की, त्याच्या पत्नीचं त्याच्या मित्रासोबत अफेअर सुरु होतं. यांग म्हणाला की, माजी मेअर मिस्टर लिऊ जो माझे चांगले मित्र होते आणि नियमितपणे त्यांचं घरी येणं-जाणं सुरु होतं. यादरम्यान पत्नीसोबत लिऊची भेट झाली होती. त्यानंतर त्याची पत्नी लिऊसोबत काम करु लागली.
मात्र, यांगच्या पत्नीने हे सगळे आरोप फेटाळले होते. कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ केवळ एक दुर्घटना होती. यांगने आरोप केला की, या व्हिडीओमुळे त्याचं आयुष्य उद्धस्त झालं. दोघांच्याही लग्नाला २० वर्षे झाली होती. यांगने त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातही शेअर केला होता.
यांगचं म्हणणं आहे की, त्याला आधीच पत्नीवर संशय होता की, तिची लिऊसोबत अफेअर सुरू आहे. यांगने स्थानिक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती, पण त्यावर काही कारवाई झाली नव्हती. या सर्व प्रकारावर यांगच्या पत्नीने सांगितले की, लिऊ घटनेच्या दिवशी नशेत होता आणि त्यामुळे असं झालं. असं केवळ एकदाच झालं होतं. तसेच या महिलेने आरोप केला की, हा व्हिडीओ डेस्कटॉप कॅमेराने नाही तर एखाद्या सीक्रेट कॅमेराने शूट केला गेला होता.