शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Video - हृदयद्रावक! नवरदेवाला हळद लावताच मृत्यूने गाठलं, अवघ्या काही सेकंदात आक्रित घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 3:42 PM

हळदी समारंभात एक व्यक्ती नवरदेवाला हळद लावताना दिसत आहे. मात्र हळद लावल्यानंतर काही सेकंदातच एक विपरित घटना घडते

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये हळदी समारंभात एक व्यक्ती नवरदेवाला हळद लावताना दिसत आहे. मात्र हळद लावल्यानंतर काही सेकंदातच एक विपरित घटना घडते. हळद लावणारा व्यक्ती अचानक खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अशा वाढत्या प्रकरणांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते मनोज सिंह यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचवेळी त्यांनी यापूर्वी असे कधीच नव्हते, अचानक मृत्यूचा महापूर आला आहे! या भीषण भयावह जीवघेण्या समस्येचा सरकारने विचार करायला हवा. याची कारणे जाणून घेतली पाहिजेत असं म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर आणि कुटुंबातील सदस्य त्या व्यक्तीला खाली पडताच उचलतात. व्हिडिओमध्ये महिला आणि लहान मुलांच्या ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येतो.

वय 17 वर्षे असो वा 70 वर्षे. अशा घटना या सातत्याने घडत आहेत. मंदिरात पूजा करताना मृत्यू झाला. लग्नाच्या कार्यक्रमात नाचत असताना खाली पडून मृत्यू झाला. व्यायामशाळेत वर्कआउट, योगा किंवा मॉर्निंग वॉक करतानाही लोकांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना घडल्या आहेत. अपोलो हॉस्पिटल इंदूरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अखिलेश जैन यांनी वेबदुनियाला सांगितले की, आजकाल अधिकाधिक लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे हे खरे आहे. पण हे गेल्या दशकभरापासून सुरू आहे. 

जीवनशैली आणि ताणतणाव यासह अनेक कारणे असल्याचे ते सांगतात. हृदयविकार हा जीवनशैलीचा आजार असून अनेक जोखीम घटक आहेत. यामध्ये रक्तदाब, मधुमेह आणि आनुवंशिक यांचा समावेश होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदय बिघडले आहे. डॉ. अखिलेश जैन यांनी सांगितले की, जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा 20 ते 25 टक्के रुग्ण रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल