Bengaluru Viral News: तुम्ही अनेकांना बाईक किंवा स्कूटर चालवत असताना फोनवर बोलताना पाहिले असेल. काहीजण धावत्या बाईकवर चॅटिंगही करतात. पण, कर्नाटकची राजधानी बंगळुरुतून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. बंगळुरुला भारताचे टेक हब म्हणून ओळखले जाते. देशभरातील हजारो लाखो तरुण या शहरात नोकरीच्या निमित्ताने येतात. हे शहर भारतातील सर्वात व्यस्त शहरांपैकी एक आहे. शहरातून अनेकदा ट्रॅफिकशी संबंधित बातम्या येत असतात.
स्कूटरवर व्हिडिओकॉल..खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी बॉसचा कॉल किंवा ऑफिस मीटिंग खुप महत्वाची असते. तुम्ही कितीही व्यस्त असाल, तरीही तुम्हाला हा कॉल अटेंड लागतो. पण, बंगळुरुतील एका व्यक्तीने ऑफिसच्या कॉलसाठी चक्क आपला जीव धोक्यात घातला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती चक्क स्कूटर चालवत असताना लॅपटॉपवर व्हिडिओ कॉल अटेंड करताना दिसतोय.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेट घालून स्कूटर चालवत असल्याचे दिसत आहे. स्कूटरचा वेगही जास्त आहे. अशा परिस्थितीत त्याने मांडीवर लॅपटॉप ठेवून झूम कॉल अटेंड करतोय. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @peakbengaluru नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, 'बंगळुरू नवीन लोकांसाठी नाही,' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ 23 मार्च रोजी शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून याला 1.13 लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत.