एलियन आणि यूएफओ हे शब्द तुम्हीही अनेकदा ऐकले असतील आणि याबद्दल बरच वाचलंही असेल. पण खरंच एलियन्सचं अस्तित्व आहे का? हे आजवर कुणीच ठामपणे सांगू शकलेलं नाही. पण जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी एलियन्स पाहिल्याचा दावाही केला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मानवाला अजूनही वेगळ्या जगातून आलेल्या या एलियन्सबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही.
सध्या एका व्यक्तीची खूप चर्चा होत आहे, ज्याचा दावा आहे की त्याची एलियन्सची नुसती भेट झाली नाही, तर त्यानं अंतराळात एलियन्ससोबत दोन हात देखील केले आहेत. हा एक आश्चर्यकारक आणि विचित्र दावा आहे. बरं या व्यक्तीनं याचे आपल्याजवळ पुरावे असल्याचंही म्हटलं आहे.
Russ Kellett नावाच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, ब्रह्मांडात एलियन्सच्या विविध प्रजाती आहेत आणि त्या वेगवेगळ्या एलियन प्रजातींमधील युद्धात त्यानं आपली गेली ३० वर्षे 'सुपर सोल्जर' म्हणून घालवली आहेत. ५८ वर्षीय Russ Kellett यानं एक फुटेज देखील शेअर केलं आहे. यातून त्यानं पृथ्वीबाहेर जनजीवन असल्याचा दावा केला आहे.
आकाशात दिसले यूएफओरसने केलेटनं सांगितले की, एके दिवशी संध्याकाळी तो चहा पित बसला होता. त्यानं आकाशात पाहिलं तर त्याला अचानक आकाशात दोन महाकाय गोळे चमकताना दिसले. मग थोड्याच वेळात ते गोळे ढगांमध्ये दिसेनासे झाले. यानंतर अशी गूढ गोष्ट पुन्हा दिसेल या विचाराने त्यानं कॅमेरा काढला आणि समुद्रकिनारी चालायला सुरुवात केली. दरम्यान, त्यानं एकाच वेळी एलियन्सची अनेक लढाऊ विमानं पाहिली. त्याचा डोळ्यांवरही विश्वास बसत नव्हता. नंतर त्यानं हे रहस्यमय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचा दावा केला आहे.
महासागरांच्या तळाशी आहे एलियन्सचे लपण्याचं ठिकाण?रसचा असा विश्वास आहे की एलियनची ती विमाने उत्तर समुद्राखालील गुप्त तळावरून आली होती. तो म्हणतो की, 'मला वाटते की एलियन्सनी जगभरातील महासागरांच्या खोलवर लपण्याची जागा बनवली आहे, ज्यामुळे आपण त्यांना शोधू शकत नाही". डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत, रस यांनी महत्वाचं विधान केलं. "एलियन्सने त्यांचे किमान ६० वेळा अपहरण केलं आहे". आपण केवळ १६ वर्षांचे असताना पहिल्यांदाच आपलं अपहरण झालं होतं. अपहरणकर्ते एलियन १५ फूट उंच होते आणि ते एखाद्या ड्रॅक्युलासारखे दिसत होते, असाही दावा रस यांनी केला आहे.