नवी दिल्ली-
एक व्यक्ती खूप दारू प्यायला मग त्यानं वायग्राच्या दोन गोळ्या घेतल्या पण यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. त्याला स्ट्रोक आला आणि त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टची माहिती देखील जर्नल ऑफ फोरेन्सिंग मेडिसनमधून सविस्तर प्रकाशित करण्यात आली आहे.
पोस्टमार्टम करणाऱ्या एम्सचे डॉक्टर जय नारायण पंडित यांनी सांगितलं की, संबंधित व्यक्तीला स्लाइडनाफिल (वायग्रा) घेण्याचा सल्ला देण्यात आला नव्हता. तरीही त्यानं या औषधाचं सेवन केलं. संबंधित व्यक्ती आपल्या एका मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये थांबला होता. जिथं त्यानं वायग्राच्या ५० एमजी पावरच्या दोन गोळ्या घेतल्या होत्या.
मृत व्यक्तीची ओळख रिपोर्टमधून जारी करण्यात आलेली नाही. नमूद माहितीनुसार त्याचा रक्तदाब वाढला होता. त्यानंतर आधीच मद्यपान केलं होतं. त्यामुळे रक्तातील मद्याचं प्रमाण निर्धारित क्षमतेपेक्षा दुप्पट होतं. त्याला स्ट्रोक आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. संबंधित व्यक्तीनं नेमकं कोणत्या कंपनीची गोळी घेतली होती याची माहिती देण्यात आलेली नाही. तसंच ही घटना नेमकी कुठे घडली आणि रुग्णाचं नाव काय हे देखील जाहीर करण्यात आलेलं नाही.
मद्यपान करुन वायग्रा गोळी घेतल्यानंतर त्या व्यक्तीला डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. तरीही त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीनं कोणत्याही डॉक्टरची त्यावेळी मदत घेतली नाही. तिनं केलेल्या दाव्यानुसार संबंधित व्यक्तीमध्ये याआधीही अशी लक्षणं आढळून आली होती.
डॉक्टरांनी याप्रकरणानंतर लोकांनी डॉक्टरांच्या सल्लाविना कोणत्याही गोळ्याचं सेवन करू नये असं आवाहन केलं आहे. सामान्यत: पुरुष मंडळी अशा गोळ्या आपली सेक्स पावर वाढवण्यासाठी घेतात. पण त्या आरोग्यासाठी धोकादायक देखील असतात ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे.
ब्लड प्रेशर वाढलं अन्...पॅथालॉजिट्सनं सांगितलं की संबंधित व्यक्तीला स्ट्रोक येण्याचं कारण म्हणजे त्यानं आधीच खूप मद्यपान केलं होतं. त्यानंतर वायग्राच्या गोळ्या घेतल्या. यामुळे ब्लड प्रेशर वाढलं गेलं. यामुळे मेंदुच्या नसांवरील प्रेशरमध्ये वाढ झाली आणि त्याला स्ट्रोक आला. त्याच्या शरीरात रक्तातील मद्याचं प्रमाण १८६.६१ मिलीग्राम इतकं होतं. जे सामान्यत: ८० मिलीग्राम इतकं सर्वोच्च पातळी मानली जाते. म्हणजेच रक्तातील मद्याचं प्रमाण दुप्पट होतं.