एका तरुणाचे तीनही जुळ्या बहिणींवर प्रेम झाले आहे. हा तरुण आता काही दिवसातच या तीन तरुणींशी विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसापासून तो तरुण या तीन बहिणी रिलेशनशीपमध्ये आहे. केनियामधील या तीन तरुणी सख्ख्या बहिणी आहेत. केट, ईव्ह, मेरी अस या तरुणींची नाव आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. तर प्रियकराचे नाव स्टीवो आहे.
स्टीवोची पहिली भेट केट सोबत झाली होती. यानंतर केटने आपल्या तीन बहिणींची ओळख स्टीवोसोबत करुन दिली. या तीनही बहिणी जुळ्या आहेत. तिघीही संगीत क्षेत्रात करिअर करतात.
हे ज्या धर्माचे आहेत, त्या धर्मात एकापेक्षा जास्त व्यक्तींशी लग्न करण्यास मनाई आहे. जरी स्टीव्हो म्हणतो की, 'मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे आणि मला प्रत्येक गोष्टीत, अगदी आशीर्वाद देखील मिळतात, म्हणून ते मला बिग मॅन स्टीव्हो म्हणतात. माझा विश्वास आहे की माझे प्रेम एका मुलीवर कधीच नव्हते आणि मी बहुपत्नीत्व करणारा पुरुष म्हणून जन्माला आलो आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. मी नेहमीच प्रामाणिक आणि निष्ठावान राहिलो आणि माझ्या पूर्वीच्या मैत्रिणी मला सोडून गेल्या कारण मी त्यांना सांगितले की मला दुसरी पत्नी हवी आहे.
केनियामध्ये राहणारा स्टीवो पुढे म्हणाला, 'मला फसवणूक करायची नाही, मला तिन्ही हवे आहेत आणि योगायोगाने मला हा आशीर्वाद जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत आहे.' दोन महिने झाले आणि आम्ही चौघे दिवसभर एकत्र राहतो. प्रत्येकजण एकमेकांकडून शिकत आहे आणि आपला वेळ काढत आहे. त्याचबरोबर या तिन्ही बहिणींनी टाइम टेबल तयार केले असल्याचे त्याने सांगितले.
'तिन्ही बहिणींना आनंदी ठेवत आहे. सोमवारी मेरीसोबत, मंगळवारी केट आणि बुधवारी ई्व्हसोबत राहतो. त्यानंतर चौघेही वीकेंडला एकत्र राहतो, असंही स्टीव्हो म्हणाला.