Man Eats World's Hottest Chilli: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम पेजवर नियमितपणे थ्रोबॅक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जातात. या व्हिडीओंमध्ये डोकं चक्रावून सोडणारे वर्ल्ड रेकॉर्ड बघायला मिळतात. नुकताच एक कॅलिफोर्नियातील व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्याने ८.७२ सेकंदात ३ कॅरोलिना रीपर मिरच्या खाऊन रेकॉर्ड तोडला.
कॅरोलिना रीपर मिरची ही जगातली सर्वात तिखट मिरची मानली जाते. ग्रेगरी फोस्टर नावाच्या व्यक्तीने डाउनटाउन सॅन डिएगोमध्ये सीपोर्ट शॉपिंग सेंटरमध्ये सर्वात कमी वेळात तीन कॅरोलिना रीपर मिरच्या खाऊन रेकॉर्ड बनवला. ग्रेगरीला तिखट पदार्थ खूप आवडतात. ज्यामुळे त्याने हे करण्याचा विचार केला होता. त्याने माइक जॅकचा ९.७२ सेकंदाचा रेकॉर्ड तोडला.
ग्रेगरी आपल्या दुसऱ्या प्रयत्नातच रेकॉर्ड बनवण्यात यशस्वी ठरला. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्याने सहा सुपर हॉट मिरच्या खाल्ल्या. पण त्याला अयोग्य घोषित करण्यात आलं होतं. कारण त्याच्या तोंडात मिरची शिल्लक राहिली होती. व्हिडीओत तो एकापाठी एक मिरची खाताना दिसत आहे. ग्रेगरीने सर्वात कमी वेळात मिरच्या खाऊन आपलं तोंड उघडलं आणि आवाज केला.
एका कमेंटमध्ये या पेजने माहिती दिली की, 'अमेरिकेच्या साउथ कॅरोलिनामध्ये विन्थ्रोप विश्वविद्यालयाद्वारे करण्यात आलेल्या टेस्टनुसार, कॅरोलिना रीपर काळी मिरची सर्वात तिखट मिरची आहे.