कामाच्या वाढत्या तणावामुळे लोकांकडे स्वत:ची कामे करण्याचा पुरेसा वेळच राहत नाही. त्यामुळे जेवणाच्या पदार्थांपासून ते वेगवेगळ्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर केल्या जातात. अलिकडे बाहेर जेवण ऑर्डर करण्याचं प्रमाण फारच वाढलं आहे. त्यासाठी कितीतरी अॅप्सही माबोईलमध्ये आले आहेत.
मात्र ऑनलाइन ऑर्डरमध्ये अनेकदा वेगवेगळ्या समस्या झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील. म्हणजे ऑर्डर केलं एक आणि पार्सल मिळालं दुसरं, असं अनेकदा अनेकांसोबत झालं असेल. काही वेळातर अनेकांना वस्तूऐवजी दगडही मिळाली आहेत. जेवणाबाबत कधी शिळं किंवा खराब झालेले पदार्थ मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण नुकत्याच सुरु झालेल्या उबर डिलिवरी 'उबर इट्स' ने असं काही केलं जे कधी कुणासोबत झालं नसेल.
एका रिपोर्टनुसार, फ्लोरीडातील लियो नावाच्या व्यक्तीने एका जपानी रेस्टॉरन्टमधून जेवण ऑर्डर केलं होतं. जेवणाची ऑर्डर उबर इट्सकडून आली आणि लियोने पैसे देऊन जेवण घेतलं. जेवणाची आलेलं पार्सल घेऊन लियो आत रुममध्ये गेला. पॅकेट उघताना त्याला त्यावर एक पांढरा कपडा दिसला. त्याला सुरुवातील वाटलं की, ही एखादी फॅन्सी नॅपकिन असेल. पण जेव्हा त्याने पॅकिंग पूर्णपणे काढलं तेव्हा त्याला एक घाणेरडी अंडरविअर दिसली.
लियोनुसार, त्याने ती अंडरविअर त्याच डब्यात टाकून उबर, जपानी रेस्टॉरन्ट आणि पोलिसांना फोन केला. सर्वांनाच या घटनेने धक्का बसला. पण सर्वांनी सांगितले की, ते याप्रकरणी काहीच करु शकत नाहीत.
रिपोर्टनुसार, उबर प्रवक्ता म्हणाले की, जे काही झालं ते चुकीचं झालं. आम्ही त्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, जे या ऑर्डरला जबाबदार आहे. जेणेकरुन याची चौकशी व्हावी.