Statue Of Liberty : पंजाबमधील लोक वेगवेगळ्या देशांमध्ये सेटल होतात. तिथे वेगवेगळी कामे करतात किंवा दुकानं चालवतात. जास्तीत जास्त तरूण अमेरिका किंवा कॅनडामध्ये शिफ्ट होतात. पण सगळ्यांचाच व्हिसा पास होतो असं नाही. अशाच एका तरूणाने अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने एक वेगळाच कारनामा केलाय. एका तरूणाने जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आपल्या घरावर लावला आहे.
सोशल मीडियावर घरावर लावलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ पंजाबच्या तरनतारन जिल्ह्याच्या एका गावातील आहे. असं सांगितलं जात आहे की, येथील एका तरूणाने US चा Visa रिजेक्ट झाल्यानंतर चक्क आपल्या घरावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी लावला आहे.
व्हिडीओत काही लोक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी क्रेनच्या माध्यमातून इमारतीच्या वर लावताना दिसत आहेत. छतावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा केल्यावर लोक त्याच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'यूनाइटेड स्टेट ऑफ अमृतसर.' दूसऱ्याने लिहिलं की, 'अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याचा राग'. तिसऱ्याने लिहिलं की, 'पंजाबमध्ये विमान, एसयूवी आणि सगळ्या प्रकारच्या आकाराच्या पाण्याच्या टाक्या मिळतील'. चौथ्याने लिहिलं की, 'आता लोक स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी या घरात जाऊ शकतात. न्यूयॉर्कला जाण्याची गरज नाही'.