आपल्याकडे दोन शेजारी कधीच बिना वादाचे राहत नाहीत, काही ना काही कारणामुळे वाद-विवाद होत असतात. सध्या असेच एका शेजाऱ्यांची भांडणे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. एका शेजाऱ्याने वाद झाल्यानंतर दुसऱ्या शेजाऱ्याची ११०० कोंबड्यांना घाबरवून मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने एका व्यक्तीला दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
Video: कोल्ड ड्रिंकमध्ये दारू टाकून पिणाऱ्या तरूणींना पोलिसांना पकडलं आणि मग....
ही घटना चीनमधील आहे. एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी घृणास्पद कृत्य केले आहे. बदला घेण्याच्या रागात त्या व्यक्तीने शेजारच्या कोंबडी फार्ममध्ये घुसला आणि कोंबड्यांना घाबरवू लागला यात त्यांचा मृत्यू झाला. कोंबड्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली आणि चेंगराचेंगरी आणि यात ११०० कोंबड्यांना आपला जीव गमवावा लागला.
ही घटना चीनची असल्याचे सांगितले जात आहे. शेजाऱ्यांच्या १,१०० कोंबड्या मारणाऱ्या माणसाची ओळख त्याच्या टोपणनावाने झाली आहे, एप्रिल २०२२ मध्ये घडलेल्या एका घटनेवरून शेजारी झोंगसोबत वाद सुरू होता. झोंगने परवानगीशिवाय त्याची झाडे तोडली. यामुळे त्या व्यक्तीला खूप राग आला आणि त्याला बदला घ्यायचा होता.
त्या व्यक्तीने सूडाने एक दिवस संधी साधून, तो शेजारच्या झोंग यांच्या कोंबडी फार्ममध्ये गेला आणि नंतर कोंबड्यांना घाबरवण्यासाठी टॉर्चचा वापर केला. त्यामुळे कोंबड्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. टॉर्चच्या प्रकाशाने कोंबडी घाबरली आणि चेंगराचेंगरी झाली. अशातच कोंबड्यांचा मृत्यू झाला.