सध्या सोशल मीडियावरून प्राण्यांवरच्या अत्याचाराच्या केसेस समोर येत आहेत. राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका गाईच्या वासरासोबत क्रूरता दाखवलेली दिसून येत आहे. हा माणूस वासराला वीटेनं मारत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. ही गोष्ट दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचली आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंडावली परिसरातील आहे. या माणसानं क्रुरतेच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. या माणसाचं नाव कमल सिंग असल्याचे समोर येत आहे. रस्त्यावर चालत असताना गाईच्या वासरानं या माणसाचा रस्ता अडवला. त्यानंतर कमल सिंगचा राग अनावर झाल्यानं त्यानं वासराला मारायला सुरुवात केली. वीटेचा मार लागल्यामुळे बछड्याला जखम झाली आणि जागच्याजागी बसले. वेदना सहन न झाल्यानं वासराच्या ओरडण्याचा आवजही येत होता.
डिसीपी दिपक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''कोणीतरी मला ट्विटरवर टॅग केलं. त्यानंतर मी या घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी जखमी अवस्थेतील वासराला संयज गांधी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. '' मंडावली पोलिस स्थानकात एनॅमल एक्ट अंतर्गत आरोपी कमल सिंह याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. जनावरांशी निर्दयता दाखवल्याप्रकरणी आरोपी कमल सिंह याला अटक करण्यात आली आहे.
हत्तीच्या दातांना लटकून मारत होती पुशअप्स; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
सोशल मीडियावर एका महिलेनं हत्तीच्या दातांचा वापर करून केलेला लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. माणसांनी केलेल्या अत्याचारामुळे प्राण्यांना अनेक वेदना सोसाव्या लागतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असेलल्या महिलेचा विचित्र प्रकार वााचून तुम्हालाही राग येईल.
या महिलेनं व्यायाम करण्यासाठी हत्तीच्या दातांचा वापर केला आहे. Emma Roberts नावाच्या महिलेनं हत्तीच्या दातांना लटकून पुशअप्स मारले आहेत. इंडिया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार ही घटना दक्षिण आफ्रिकेतील मुबलामध्ये घडली आहे. एका हत्ती पार्कमध्ये महिलेनं हा कारनामा केला आहे. लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली
सोशल मीडियावर एलिफंटपार्कमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. हा फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हत्तीच्या दातांचा उपयोग वजन उचलण्यासाठी केला जाऊ शकत नाही. प्राण्यांचा विश्वास जिंकणं शिका. अशा आशयाचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांनी प्राण्यांबाबत सहानुभूती ठेवायला हवी. अशाही कमेंट्स आल्या आहेत. याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण