कोरोना काळात वर्क फ्रॉम होम लोकांसाठी फारच आरामदायक झालं आहे. कारण लोक घरात फिरता फिरता खाण्या-पिण्यासाठी फ्रीजमध्ये बघू शकतात. घरी कुणाचेही कॉल घेता येतात. पण अनेकदा लोक कामात असे काही मग्न होतात की, आपल्या आजूबाजूला काय आहे हेही त्यांच्या लक्षात राहत नाही आणि अजब स्थितीत अडकतात.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती घरातील त्याच्या स्वीमिंग पूल किनारी फिरत मोबाइल फोनवर बोलत होता. चालत असताना त्यांचं खाली फारचं लक्ष नव्हतं. तेव्हाच ही व्यक्ती पूलमधील पाण्यात पडते. पण तो पूर्णपणे पडला नाही. थोडक्यात वाचला. स्वीमिंग पूलमध्ये पडल्यावर तो तिथेच फोनवर बोलत बसतो. जणू काही झालंच नाही.
इतकंच काय तर इतकं सगळं होऊनही त्या व्यक्तीने फोन काही ठेवला नाही. व्हिडीओत स्पष्टपणे बघता येत आहे की, तो बोलण्यात किती मग्न आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक पोट धरून हसत आहेत.
इन्स्टाग्रामवर टिम कॉनवे ज्यूनिअर नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यावर लोकांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलंय की, 'माझे वडील कॉन्फरन्स कॉल दरम्यान स्वीमिंग पूलमद्ये पडले आणि बोलत राहिले'.