अनेकदा फॉर ए चेंज म्हणून आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. जेवण झाल्यानंतर ज्यावेळी बिल देण्यात येतं त्यावेळी आपल्याला जेवणं आणून देणाऱ्या वेटरला टिप देण्याची पद्धत असते. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर वेटरला टिप म्हणून वेटरला टिप म्हणून 100 ते 200 रूपयांची टिप दिलेलं ऐकलं असेल. सध्या इंटरनेटवर एका यूट्यूबरची फार चर्चा होत आहे. त्याने एका हॉटेलमध्ये एका वेटरेसला तब्बल 10 हजार डॉलर टिप म्हणून दिले आहेत. म्हणजे भारतीय चलनामध्ये 7 लाख रूपये.
ऐकून थक्क झालात ना? ही खरी गोष्ट आहे. एका नावाजलेल्या यूट्यूब व्लॉगरने एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन पाण्याच्या दोन बाटल्या खरेदी केल्या आणि तेथील वेटरला 10 हजार डॉलर टिप म्हणून दिले. या वेटरेसचं नाव एलिना कस्टर असून Sup Dogs नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ती काम करते.
एका दिवशी नेहमीप्रमाणे काम करत असतानाच एक व्यक्ती आली आणि त्याने एलियाकडे दोन पाण्याच्या बाटलीची मागणी केली. तिने त्याला पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या आणि त्याने दिलेले पैसे बिल काउंटरला देण्यासाठी निघून गेली. ती जेव्हा पुन्हा टेबलजवळ पोहोचली त्यावेळी ती थक्क झाली. कारण त्यावेळी टेबलवर टिप म्हणून 10 हजार डॉलर ठेवले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टिप म्हणून 10 हजार डॉलर देणाऱ्या व्यक्तीचं नाव जिमी डोनाल्डसन असून तो एक यूट्यूब व्लॉगर आहे. जिमीची खरी ओळख MrBeast म्हणून आहे. आतापर्यंत जिमीच्या चॅनेलचे 8.8 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.