एका व्यक्तीने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट मिंत्रावरून फुटबॉल स्कॉकिंग्स ऑर्डर केले होते. पण त्याबदल्यात त्याला जे मिळालं ते बघून तो हैराण झाला. झालं असं की, फुटबॉल स्टॉकिंग्स ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला ब्रा ची डिलिव्हरी मिळाली. त्याने या घटनेबाबत ट्विटरववर एक पोस्ट केली, जी आता व्हायरल झाली आहे.
ट्विटरवर @LowKashwala अकाउंटवरून Myntra ला टॅग करत एक पोस्ट केली आहे. यात व्यक्तीने काही स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. त्यात त्याने सांगितलं की, त्याला चुकीचं प्रॉडक्ट डिलीव्हर झालं आहे. त्याने सांगितलं की, त्याने त्याच्यासाी फुटबॉल स्टॉकिंग्सची ऑर्डर दिली होती. पण त्याला Triumph नावाच्या ब्रॅन्डची एक ब्रा मिळाली आहे.
या व्यक्तीने सांगितलं की, कंपनीने त्याला मिळालेलं चुकीचं प्रॉडक्ट परत घेण्यास नकार दिला आहे. कस्टमर केअरसोबत बोलल्यावर ते म्हणाले की, आम्ही हे प्रॉडक्ट रिप्लेस करू शकत नाही.
ट्विटर यूजरचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. कमेंट्समध्ये इतरही काही लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. काही लोकांनी ई-कॉमर्स साइटवर टिका केली आहे.