कोरोना व्हायरसमुळे ठिकठिकाणांवर चेकिंग सुरू आहे. विमानतळांवर पोलीस उभे आहेत. तापमान चेक केलं जात आहे. दरम्यान यासाठी फिलिपीन्समध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला थांबवलं. तर तो दारू पिऊन असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी त्याला विचारले की, तू दारू गाडी का पळवतोय? त्याने उत्तर दिलं की, कोरोनापासून बचावासाठी त्याने वोडकाचं सेवन केलं.
ABS-CBN News ने आपल्या ट्विटर पेजवर हा व्हिडीओ शेअर केलाय. ही व्यक्ती आपल्या घरी जात होती. रस्त्यात त्याला चेकिंगसाठी पोलिसांनी थांबवलं तर त्याला ताप असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी लगेच त्याची गाडी बाजूला लावली. मुळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की, मद्यसेवन केल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकत नाही.
या व्यक्तीचं तापमान दोनदा चेक करण्यात आलं. दोन्हीवेळा त्याला ताप असल्याचं दिसून आलं. अखेर त्याने पोलिसांना खरं ते सांगितलं. त्याने सांगितले की, त्याने घरी जाण्याआधी कोरोनापासून बचावासाठी वोडकाचे दोन शॉट्स लगावले. त्यामुळे त्याचं तापमान वाढलं असू शकतं. त्याला दारू पिऊन गाडी चालवण्याचा दंड भरावा लागलाय.
काही दिवसांपासून दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो असे खोटे मेसेज व्हायरल झाले आहेत. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने स्पष्ट केलं की, अल्कोहोल सेवन करून कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून स्वत:चं नुकसान करून घेऊन नका.