कोरोना काळात मास्क आणि सॅनिटायजर आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण भाग बनला आहे. कोरोनाच्या माहामारीने लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले असून आता लोक लहानात लहान गोष्टींसाठी स्वच्छतेचा विचार करताना दिसून येत आहेत. भाज्या, फळं किंवा बाहेरून आणलेली कोणतीही वस्तू सॅनिटाईज करून मगच लोक वापरत आहे. भाज्या. फळं सॅनिटाईज करण्यासाठी प्रत्येक घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो.
जास्तीत जास्त लोक गरम पाण्यात किंवा मीठाच्या पाण्याच्या साहाय्याने भाज्या आणि फळं धुतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.भाज्या धुण्यासाठी केलेला एक आगळा वेगळा जुगाड या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. प्रेशर कुकरच्या वाफेने भाज्या धुण्याचा नवीन जुगाड शोधून काढला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आयएएस सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे. भाज्या सॅनिटाईज करण्याचा अजब जुगाड असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. कुकरची शिटी काढून पाईप जोडलेला आहे. कुकरमधून बाहेर येत असलेल्या वाफेने भाज्या आणि फळं सॅनिटाईज होत आहेत. भाज्या धुत असलेल्या माणसाच्यामते गरम पाण्यामुळे भाज्या खराब होण्याची शक्यता असते. पण वाफेद्वारे स्वच्छ करण्यात आलेल्या भाज्या स्पर्श न करताही चांगल्या साफ होतात.
सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ४३ हजारांपेक्षा व्हिव्हज आणि ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर काही लोकांनी हा प्रकार भयानक असल्याचेही म्हटले आहे.
कोरोनामुळे दमला 'बाबा'! शाळेची फी भरण्यासाठी रस्त्यावर 'मुलं विकत आहेत फुलं'...
कौतुकास्पद! पक्षाचं घरटं वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी तब्बल ३५ दिवस रस्त्यावरील लाईट्स ठेवले बंद