शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

अरे बापरे! स्केटिंग करताना झाली गंभीर दुर्घटना; अंगावर काटा आणणारा 'तो' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 5:01 PM

Viral Video : स्केटिंग करणाऱ्या लोकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज असते. यातही दुर्घटनेची शक्यता असतेच. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

एखादा अपघात किंवा दुर्घटना कधीही सांगून होत नाहीत, हे तुम्हालाही चांगलंच माहिती असेल. त्यामुळे रस्त्यावर चालताना अतिशय सावध राहणं आवश्यक आहे. तुम्ही पाहिलं असेल की भरधाव वेगातील गाड्यांचे अनेकदा अपघात होतात. याच कारणामुळे लोकांना नेहमी गाडी कमी वेगात चालवण्याचा सल्ला दिला जातो. कारण फक्त गाडी चालवणाऱ्याचंच नाही तर अपघात झाल्यास दुसऱ्याचंही नुकसान होतं. यासोबतच रस्त्यावर स्केटिंग करणाऱ्या लोकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज असते. यातही दुर्घटनेची शक्यता असतेच. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुणाला स्केटिंगची हौस भलतीच महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीसोबत रस्त्यावर स्केटिंग करताना गंभीर दुर्घटना घडली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रस्त्यावर अगदी वेगात स्केटिंग करत असतो. याचदरम्यान त्याचा बॅलन्स बिघडतो आणि अगदी जोरात तो स्केटबोर्डवरुन खाली घसरतो. वेगात स्केटिंग करत असल्यामुळे तो दूर जाऊन पडतो. सुदैवाने त्याने हेल्मेट घातलेलं असल्यानं डोक्याला मार लागत नाही. ज्या पद्धतीने हा व्यक्ती पडतो, ते पाहून अंदाज येतो की त्याला भरपूर मार लागला असेल.

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कॅप्शनमधून त्यांनी लोकांना मोठी शिकवण दिली आहे. दुर्घटना कधीच सांगून होत नाहीत. त्यामुळे वाहन चालवताना, खेळताना तसंच काम करताना आपल्याला सुचवण्यात आलेली सुरक्षा उपकरणे नेहमी नियमांसह वापरा असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

अवघ्या 5 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, तुम्ही चूक केली नाही, तरी समोरचा चूक करू शकतो. त्याचीही काळजी घ्यावी लागते. सगळ्यांना विनंती करतो, रस्त्यावर सांभाळून चालत जा. दुर्घटनेपासून वाचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल