रागाच्या भरात माणूस काहीही करून बसतो. त्याला चांगले-वाईट कशाचीही पर्वा नसते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. जेणेकरून रागामुळे तो स्वत:चं नुकसान करणार नाही आणि इतरांनाही त्रास देणार नाही. राग कितपत नुकसानदायक आहे हे माहिती असूनही काही लोक रागामुळे स्वत:वरील नियंत्रण गमावतात आणि असं काही करतात ज्याची अपेक्षा त्यांना स्वत:लाच नसते.
अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीची अशी चर्चा जगभरात सुरू आहे. ज्याने रागावर नियंत्रण ठेवले नाही आणि एक भयंकर प्रकार केला ज्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. हा प्रकार विचित्र वाटत असला तरी ते ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. या व्यक्तीने रागात कंडोम लावलेले केळ खाऊन टाकले. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरातील आतडे फाटण्याची वेळ आली होती. डॉक्टरांनी मोठ्या कष्टाने त्याचे पोट फाडून त्यातून कंडोम लावलेले केळ बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचला.
न्यूयॉर्क पोस्टने आपल्या एका रिपोर्टमध्ये या प्रकाराचे वृत्त जगातील पहिले प्रकरण असल्याचे म्हटले आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने असे कृत्य केले आणि त्यानंतर त्याचा जीव वाचला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, डॉक्टरांनी या विचित्र आणि दुर्मिळ प्रकरणावर संपूर्ण अभ्यास केला आहे, ज्याचा अहवाल क्युरियस मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे. या ३५ वर्षीय व्यक्तीच्या रागाचे कारण अहवालात दिलेले नसले तरी त्यानंतरची संपूर्ण कहाणी त्यामध्ये सांगण्यात आली आहे.
पोटदुखी, उलट्या होत असल्याची समस्या रिपोर्ट्सनुसार, कंडोमसह खालेल्लं केळ गिळल्यानंतर काही वेळाने त्या व्यक्तीला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि सतत उलट्या होऊ लागल्या. जेवण तर सोडा त्याला पाणी पिणेही कठीण झाले. याशिवाय त्याने २४ तास लघवी केली नाही आणि शौचालयातही गेला नाही. प्रकृती खूपच बिघडली, त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, जिथे त्याचं प्रथम सीटी स्कॅन करण्यात आलं, ज्याचा अहवाल पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्यांना त्या व्यक्तीच्या आतड्याजवळ अडकलेले कंडोमसह केळ दिसले. ते आतड्यात अडकल्याने ते फुटण्याची शक्यता होती.