आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे गेले आहे. कधीकाळी मोबाईल इतका अॅडव्हान्स होईल, असा विचारही कुणी केला नव्हता. पण, आज मोबाईल सर्वात अॅडव्हान्स मशीन बनले आहे. याचा चांगला उपयोग केला तर खूप मोठ्या गोष्टी होऊ शकतात. पण, याच्या वाईट वापराने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका व्यक्तीने मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या महिलेला चांगलीच अद्दल घडवल्याचे दिसत आहे.
आजकाल तरुणांपासून मोठ्या लोकांपर्यंत, अनेकजण मोबाईलमध्ये इतके व्यस्त होतात की, त्यांना आजुबाजुला काय घडत आहे, त्याचेही भान नसते. यामुळे अनेकदा अनुचित घटनाही घडल्या आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या चिमुकल्यासह रस्त्यावर उभी असल्याचे दिसत आहे. चिमुकला स्ट्रोलरमध्ये(लहान मुलांची गाडी) बसलेला आहे आणि महिला मोबाईल पाहण्यात व्यस्त आहे. तिचे आपल्या बाळाकडे अजिबात लक्ष नाही. या महिलेला अद्दल घडवण्यासाठी एक अनोळखी व्यक्ती गुपचूप मुलाला घेऊन जातो.
काही सेकंदांनंतर महिलेचे लक्ष स्ट्रोलरकडे जाते, तेव्हा तिला आपले मूल दिसत नाही. मूल गायब झाल्यामुळे महिला अस्वस्थ होते, ती इकडे-तिकडे पाहू लागते. तेवढ्यात तो व्यक्ती महिलेच्या बाळाला घेऊन येतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @NoCapFights नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 5 मिलियन म्हणजेच 50 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 63 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.