मुक्या जनावरांवर होत असलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. अशा घटना वाचून नेहमीच सोशल मीडिया युजर्सकडून हळहळ व्यक्त केली जाते. कजाकिस्तानमधून माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे. या विकृत माणसानं रागाच्या भरात आपल्या कुत्र्याला कारच्यामागे दोरीनं बांधलं आणि संपूर्ण शहरात फरपटत नेलं. यादरम्यान या कुत्र्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. शरीराच्या काही भागातून रक्तही बाहेर येत होतं. या घटनेचा एका व्हिडीओसुद्धा समोर आला आहे.
इंडिया टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना ७ जानेवारीला घडली. हे कृत्य दुसऱ्या वाहन चालकांनी पाहिले आणि त्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि गाडी थांबविण्यास भाग पाडले. ईस्ट टू वेस्टने दिलेल्या वृत्तानुसार एका प्राणी हक्क अभियानात कार्यरत असलेल्या लोकांनी अखेरीस जखमी कुत्र्याची सुटका केली. तो माणूस कारमधून खाली आला आणि त्याला विचारले गेले" तू असे का करीत आहेस? " यावर त्याने उत्तर दिले नाही.
या घटनेनंतर कुत्र्याचे संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले होते. बचावकर्त्यासह चालकाच्या घराच्या मैदानावरुन गंभीर जखमी झालेला कुत्रा शोधण्यात आणि त्याला वाचविण्यात यश आलं आहे. कुत्र्याला ताबडतोब क्लिनिकमध्ये नेण्यात आलं आणि योग्य उपचार करून पेनकिलर देण्यात आली. जखमांवर काळजीपूर्वक उपचार करण्यात आले. या घटनेनंतर सोशल मीडिया युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बोंबला! ट्रेनमधील सीट कव्हर चोरून तयार केला बोल्ड क्रॉप टॉप, फोटो व्हायरल होताच वाढल्या अडचणी....
हत्तीच्या दातांना लटकून मारत होती पुशअप्स; सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
एका महिलेनं हत्तीच्या दातांचा वापर करून केलेला लाजिरवाणा प्रकार समोर आला होता. माणसांनी केलेल्या अत्याचारामुळे प्राण्यांना अनेक वेदना सोसाव्या लागतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असेलल्या महिलेचा विचित्र प्रकार वााचून तुम्हालाही राग येईल.
या महिलेनं व्यायाम करण्यासाठी हत्तीच्या दातांचा वापर केला होता. Emma Roberts नावाच्या महिलेनं हत्तीच्या दातांना लटकून पुशअप्स मारले आहेत. ही घटना दक्षिण आफ्रिकेतील मुबलामध्ये घडली होती. एका हत्ती पार्कमध्ये महिलेनं हा कारनामा केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हत्तीच्या दातांचा उपयोग वजन उचलण्यासाठी केला जाऊ शकत नाही. प्राण्यांचा विश्वास जिंकणं शिका. अशा आशयाचे मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ना डाएट, ना व्यायाम! १०० वर्षांच्या मॉर्डन आजींना दिला दीर्घायुष्याचा मंत्र, वाचा हे सिक्रेट