शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

Viral Video: अंगातली मस्ती नडली! बिबट्यासोबत मस्करी करायला गेला, बिबट्याने जे केलं ते पाहुन बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 1:09 PM

एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एका व्यक्तीने जंगली प्राण्याला त्रास देण्याची चूक केली आणि मग जे काही घडलं, ते खरंच धक्कादायक आहे.

शिकारी प्राणी हा नेहमी शिकारीच राहातो, असं म्हटलं जातं. मग तो प्राणी पिंजऱ्यात बंद का असेना. तो आपला आक्रमक अंदाज कधीच बदलत नाही. जंगली प्राण्यांना बघण्यासाठी अनेकजण प्राणिसंग्रहालयात फिरण्यासाठी जातात. मात्र अनेकदा लोक आपल्या छोट्याशा चुकीमुळेही मोठ्या अडचणीत येतात. सध्या असाच एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एका व्यक्तीने जंगली प्राण्याला त्रास देण्याची चूक केली आणि मग जे काही घडलं, ते खरंच धक्कादायक आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की झुडपांच्या जवळ असलेल्या लोखंडाच्या पिंजऱ्यात एक बिबट्या कैद आहे. यादरम्यान एक व्यक्ती हातात काठी घेऊन तिथे जातो आणि बिबट्याला काठीने डिवचण्याचा प्रयत्न करतो. मात्र बिबट्या हे लाकूड आपल्या दातांमध्ये पकडतो आणि त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. व्यक्तीच्या या कृत्यामुळे बिबट्या चवताळतो आणि मग जोरात काठीसह या व्यक्तीला पिंजऱ्याकडे खेचतो (Leopard Attack). पिंजऱ्याच्या जवळ जाताच हा व्यक्ती जोरात ओरडू लागतो. मात्र तिथे उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती त्याला वाचवतो.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “तत्काळ कर्म…शेवटपर्यंत पाहा. वन्य प्राण्यांच्या जवळ कधीही जाऊ नका, विशेषतः जेव्हा ते तणावात असतात." बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ ३५ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, या घटनेनंतर आता हा व्यक्ती आयुष्यभर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करेल. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, पुढच्या वेळी एखाद्याला त्रास देताना शंभर वेळा विचार करेल. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTigerवाघleopardबिबट्याTwitterट्विटर