डेटिंगसाठी अलिकडे टिंडर अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. पण यावरून फसवणुकीच्याही अनेक घटना घडतात. त्यात टिंडरने एक नवं फिचर आणलंय. ते म्हणजे Gender Swap Filter. या फिचरने मुलं मुलीसारखा तर मुली मुलांसारखा लूक मिळवू शकतात.
लॉस एन्जेलिसला राहणाऱ्या ट्रॉयने हे फिल्टर वापरून १०० जणांना चांगलंच फसवलं. हे फिल्टर वापरून ट्रॉय झाला ट्रेसी. त्याने हा फोटो Tinder वर अपलोड केला. आणि पाहता पाहता २० मिनिटांमध्ये त्याला १०० मॅच आलेत. इतकंच नाही तर त्याला धडाधड मेसेजवर मेसेज येऊ लागले.
ज्या मुलांसोबत ट्रॉयला मॅच मिळालं होतं, त्यांना ट्रॉयने काही वेळाने सत्य सांगितलं. त्याने सर्व मुलांना सांगितले की, तो मुलगी नाही तर मुलगा आहे. तसेच त्याने Gender Swipe Filter वापरून त्याने हा मुलीचा लूक मिळवला होता. तेव्हा सर्वांना धक्का बसला.
मग काय आता सत्य बाहेर आल्यावर ट्रॉयला अनेकांनी अनमॅच केलं. त्यानंतर एका मुलाखतीत त्याने सांगितले की, 'जर मी खरंच ट्रेसी असतो...इतकं अटेंशन मला मी ट्रॉय असताना कधीच मिळालं नाही'.